आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात सर्व्हर डाऊन झाल्याने 40 हून अधिक उमेदवारांच्या हातून सुटला ‘बाण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अाॅनलाइन उमेदवारी अर्ज व एबी फाॅर्म दाखल करण्यात तांत्रिक अडचणी अाल्यामुळे शिवसेनेचे सुमारे ४० उमेदवार पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘धनुष्यबाण’ मिळण्यापासून वंचित राहणार अाहेत. भाजपच्या ताब्यातील महापालिका अापल्याकडे खेचून घेण्यासाठी कंबर कसलेल्या शिवसेनेला हा माेठा धक्का मानला जाताे. मात्र, भाजपनेच प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेचे अाॅनलाइन अर्ज भरताना मुद्दामहून सर्व्हर डाऊन केल्याचा अाराेप शिवसेनेचे नागपूर संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी केला अाहे.  

यासंदर्भात शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी सांगितले की, भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांचे असंतुष्ट नेते उमेदवारीसाठी शिवसेनेच्या संपर्कात होते. त्यामुळे अशा इच्छुकांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेने काही एबी फॉर्म होल्डवर ठेवले होते. त्यांच्यापैकी काहींनी पक्षाच्या वतीने ऑनलाइन फॉर्म भरून एबी फॉर्मही सादर केलेत. मात्र, शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शिवसेनेच्या काही उमेदवारांना अाॅनलाइन अर्ज भरणे शक्य झाले नाही. तांत्रिक अडचणीमुळे अाम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळ संपल्याचा दावा करत प्रशासनाने हे अर्ज स्वीकारले नाहीत. प्रशासन काेणाच्या तालावर नाचत अाहे हे अाम्हाला ठाऊक अाहे,’ असे सांगत हरडे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर अाराेप केला.  
 
दरम्यान, या प्रकाराची खासदार अनिल देसाई यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून ते याबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती हरडे यांनी दिली. भाजपने मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेनेने आताच पराभव मान्य केला असल्याचा टोलाही भाजपने लगावला आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, नाशकातही शिवसेनेचे दहा उमेदवार झाले अपक्ष...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...