आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कातलाबोडी’च्या ‘नवाबाचे पोहऱ्यात साम्राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -  शहरालगतच्या पोहरा-मालखेड परिसरात वास्तव्यास असलेला वाघ हा कळमेश्वर-कोंढाळी परिसरामधील कातलाबोडी जंगलातून येथे आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा वाघ नागपूर जिल्ह्यातील कातलाबोडी जंगलातील नवाब असून तो तब्बल १३५ किलोमीटर अंतर कापून पोहरा मालखेड जंगलात पोहचला आहे. 
 
नागपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कळमेश्वर-कोंढाळी वन विभागाच्या ‘कातलाबोडी’ परिसरात राहणारा हा ‘नवाब’ नावाचा वाघ आता खऱ्या अर्थाने पोहरा मालखेडचा म्हणजेच अमरावतीचा राजा झाला आहे. सदर छायाचित्रे कळमेश्वर - कोंढाळी परिसरातील ‘नवाब’ नावाच्या वाघाशी जुळल्याचे कुंदन हाते यांनी अमरावती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. 
एका राखीव जंगलाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले, तर त्याचे अतिशय चांगले परिणाम मिळतात. हेच यावरून पुढे आले आहे. 

नवाब नावाच्या वाघाची कातलाबोडी जंगलातील टिपलेली छाया 
अडीच वर्षांचा आहे ‘नवाब’ : ‘कातलाबोडी’येथे एका विहिरीत पडलेल्या वाघिणीला सोडण्याचा प्रयोग करण्यात आला होता. तेथे तिला अतिशय पोषक वातावरण मिळाले. तेथे त्या वाघिणीला झालेल्या तीन बछड्यापैकी हा आलेला वाघ ‘नवाब’ असल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी याच वाघिणीचा मोठा बछडा बोर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करून गेला. 

कातलाबोडीचा आहे तो ‘नवाब’ 
^पोहरा-मालखेडराखीव जंगलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये आलेल्या वाघाची छायाचित्रे पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प तसेच काही वन्यजीव अभ्यासकांना पाठवण्यात आली होती. कळमेश्वर-कोंढाळी परिसरातून आलेल्या वाघाची आम्ही सर्व काळजी घेत आहोत.” हेमंतकुमारमीणा, उपवनसंरक्षक, अम. 

जबाबदारी वाढली 
^नागपूरचा‘नवाब’आता पोहरा-मालखेड ‘राजा’ झाला आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी प्रादेशिक वनक्षेत्रातही उत्कृष्ठ वन व्यवस्थापन करता येते हे सिद्ध केल आहे. नवाब इकडे आल्याने आता वन विभाग, स्वयंसेवी संस्था स्थानिक नागरिक यांची जबाबदारी वाढली आहे.’’ यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक.