आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली जिल्ह्यातील पाेलिस चकमकीत 2 महिला नक्षलवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात येनगाव जंगल परिसरात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी महिला ठार झाल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानातील सूत्रांनी दिली. ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांजवळील साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. 
 
मंगळवारी सकाळच्या सुमारास नक्षलविरोधी अभियानाचे पथक येनगाव जंगल परिसरात मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिस पथकाने केलेल्या गोळीबारात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. त्यांचे साथीदार घनदाट जंगलात पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे साहित्य व शस्त्रे जप्त केली आहेत. महिला नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार होण्याची मागील ४८ तासांतील ही दुसरी घटना आहे. या कामगिरीमुळे नक्षलवादी अभियानाच्या पथकांचे मनोबल उंचावले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जहाल नक्षलवादी पाेलिसांना शरण येण्याचे प्रमाण वाढले अाहे. त्यामुळे ही चळवळ  खिळखिळी झाल्याचा पाेलिसांचा दावा अाहे.
बातम्या आणखी आहेत...