आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टात ओळखीतून डॉक्टरांच्या बदल्या रद्द होतात : गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांच्या नियमानुसार बदल्या होत असतात. त्यावर डॉक्टर न्यायालयात जातात व ओळखीच्या माध्यमातून त्या रद्द करवल्या जातात, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केले.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या पुरस्कार वितरण समारंभात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, "काही डॉक्टरांचे न्यायाधीशांशी चांगले संबंध निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या बदल्या रद्द होतात. डॉक्टरांना मी कोणतेही ज्ञान देऊ शकत नाही. गडचिरोलीसारख्या भागासाठी डॉक्टरांची वेगळी मेरिट लिस्ट तयार केल्यास त्याचा सर्वसामान्यांना लाभ होऊ शकेल.' अनेकदा वैद्यकीय महाविद्यालयांमधील त्रुटींवर बोट ठेवून न्यायालयाकडून शासनावर टीका होते, यावर गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, उच्च वा सर्वोच्च न्यायालय महाविद्यालये चालवू शकत नाही. शासन व कोर्टांनीही आपापल्या मर्यादा ओळखायला हव्यात. भारतीय वैद्यक परिषदेकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बंद पाडण्याचे प्रयत्न होत असल्याची टीकाही गडकरींनी केली.
बातम्या आणखी आहेत...