आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर शौच;सहा महिन्यांचा कारावास, दर दिवशी बाराशेचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबतची अवस्था भीषण आहे. अद्यापही स्वच्छतेबाबत जागरुकता नसल्यामुळे उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा गावागावांमध्ये कायम आहे. परंतु आता उघड्यावर शौचास बसणे चांगलेच महाग पडणार आहे. उघड्यावर शौचास करताना कुणी आढळला तर त्यास आता थेट सहा महिन्यांसाठी खडी फोडण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरवात होणार आहे. 
 
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने धडक्याने मोहिम आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये उघड्यावर शौचास जाण्याची पद्धत आहे. यामुळे अस्वच्छता पसरून मोठ्या प्रमाणात महिलांना कुचंबणाही सहन करावी लागते. दरम्यान, गावागावांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जिल्हा परिषदेच्यामाध्यमातून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी १६ जानेवारीपासून मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गंत उघड्यावर शौचास बसणारा आढळल्यास त्यास सहा महिन्याचा कारावास प्रति दिवशी बाराशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून पहाटे पाच वाजतापासूनच ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीस्तरावर पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही मोहिम राबविण्यासाठी पोिलस दलाचीही मदत घेतली जाणार आहे. तालुका गाव पातळीवर दक्षता समित्या तयार करण्यात आल्या असून शौचास बसणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृतीचा निषेध म्हणून फुले देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर मुंबई पोिलस अधिनियम १९५१ अंतर्गंत ११५ ११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येऊस सहा महिन्याचा कारावास ठोठावण्यात येणार आहे. 

हागणदारी मुक्तीसाठी २०१८ ची डेडलाईन: राज्यशासनाने २०१८ पर्यंत गावे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायती असून त्यापैकी २५० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरीत ५८९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...