आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरणास घातक २५ टन जैविक कचऱ्याचा दररोज होणार निचरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराच्या पर्यावरणास घातक ठरणाऱ्या जैविक कचऱ्याचा दररोज २५ टन एवढा निचरा करणे शक्य होणार आहे. शहरात पाच ठिकाणी जैविक कचरा व्यवस्थापन प्रोसेसिंग यूनीट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २२ लाखांचा खर्च अपेक्षीत असलेल्या या प्रकल्पावर स्थायी समितीकडून देखील शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
शहराच्या विविध भागातून दररोज तब्बल २५० ते ३०० मेट्रीक टन घनकचरा निघत असून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. शहरात निघत असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने सुकळी येथील कंपोस्ट डेपो देखील ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून प्रकल्पाचा प्रश्न कायम असल्याने शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. शिवाय सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचऱ्याची विल्हेवाट लावत प्रदूषण कमी करीत पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या महापालिकेच्या जबाबदारीत देखील वाढ झाली आहे.
शहरातील वाढत असलेले प्रदूषण कमी करणे तसेच पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करत त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. घनकचऱ्यापासून खताची निर्मिती करण्याचा प्रकल्प सुकळी येथे प्रस्तावित आहे. यासह शहरात मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ओल्या तसेच जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या प्रशासनासमोर निर्माण झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणात असलेले हॉटेल्स, बार, मंगल कार्यालय, भोजनालय आदी प्रतिष्ठानातून निघणारे शिल्लक अन्न, भाजीपाल्यांचा केरकचरा, बाजारातील खराब झालेला भाजीपाला तसेच कचरा, घराघरातून निघणारा ओला कचऱ्यासह विविध प्रतिष्ठानातून निघणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. ओला कचरा उचलून कंपोस्ट डेपोपर्यंत नेण्याच्या खर्च लक्षात घेता शहरात पाच ठिकाणी जैविक कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याचा महापालिका प्रशासनाकडून घघेण्यात आला. शहरात पाच ठिकाणी जैविक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आरंभ करण्यास स्थायी समितीने देखील शिक्कामोर्तब केले आहे. शहरात हा प्रकल्प लवकरच साकारला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत मिळेल.

एजंसी नेमणार : ओल्याकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करता यावीम्हणून महापालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. पाच ही झोन कार्यालय अंतर्गत प्रकल्पाकरिता एजंन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. एजंसी नियुक्त करता यावी म्हणून निविदा मागविल्या जाणार आहे. या माध्यमातून कचरा प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
प्रस्तावित जागा खर्च
झोन जागा रक्कम
एक मुक्त विद्यापीठ मागे क्रीडांगण २२७८३८
दोन मनपा झोन क्रं बाजूला ४९८०३१
तीन प्रशांत नगर कार्यालय जवळ ४९८०३१
चार आठवडी बाजार बडनेरा ४९८०३१
पाच तारखेडा कत्तलखाना ४९८०३१

स्थायीची मंजूरी
^शहरात पाच ठिकाणी जैविक कचरा व्यवस्थापन प्रोसेसिंग युनीट सुरू केल्या जाणार आहे. २२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या प्रकल्पासाठी एजंन्सी नियुक्त करण्याबाबत निविदा प्रक्रिया आरंभ करण्यात आली. यामुळे शहर स्वच्छ होणार आहे.’’ सोमनाथशेटे, अति. आयुक्त महापालिका

पाच टनाची क्षमता
पाच झोनमध्ये निर्माणाधीन असलेल्या जैविक कचरा व्यवस्थापन प्रोसेसिंग युनीटची क्षमता प्रत्येक दिवशी टन निर्धारीत करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसात या प्रोसेसिंग युनीटमध्ये टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

घनकचरा प्रकल्पास मंजूरी
सुकळी येथील कंपाेस्ट डेपो मधील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत निर्मिती प्रकल्प सुरू केल्या जाणार आहे. कोअर प्रॉजक्ट इंजीनिअर कंन्सल्टन्सी अॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजंन्सीला सुकळी येथील कंपोस्ट डेपो येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करीत खत निर्मिती करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक देखील स्थायी समिती सदस्यांकडून पाहण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरीता सुकळी येथील अतिरिक्त जागा देखील नको असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...