आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ध्यात सापडलेले दोन्ही चिमुकले शिशू केंद्रात, मजदुम व रिजवानची ओळख पटवण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - वर्धा रेल्वे स्थानकावर ६ सप्टेंबर रोजी दोन मुले हरवलेल्या स्थितीत आढळून आले असून पालक व नागरिकांनी या मुलांची ओळख पटवून घेऊन जावे, असे आवाहन आकांक्षा शिशु केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे. मजदुम (वय ५ वर्ष) व मुलगा रिजवान (वय ३ वर्ष) अशी या दोन मुलांची नावे असून चाईल्ड लाईन यांचे कडून या मुलांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने आकांक्षा शिशु केंद्रात ठेवण्यात आले आहे. हे केंद्र सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटी व्दारा चालवण्यात येत असून या दोन मुलांबद्दल संबंधितांनी तत्काळ आकांक्षा शिशु केंद्र सेवाग्राम ०७१५२ २८४९८१ येथे संपर्क साधावा. असे आकांक्षा शिशु केंद्राने कळवले.
बातम्या आणखी आहेत...