आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देयके सादरवेळी कंत्राटदार सादर करणार खड्ड्याचे फोटो, रस्त्यांवर शासनाच्या निकषांचा उतारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकीकडे जिल्हाभरातील रस्त्यांची तब्येत धड नसताना शासन कंत्राटदारांच्या वादात रस्त्यावरील प्रवास जीवावर बेतणारा ठरत आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे थेट मुरूमाने भरून बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या अचाट जीवघेण्या प्रयोगाला आळा घालण्यासाठी अखेर शासनाने डांबरी खड्डे भरण्याचे नव्याने दिशानिर्देश जारी केले आहे. त्यामुळे या निर्देशानंतर बुजविलेल्या खड्ड्यातून प्रवास करून दुचाकीस्वार सुखरुप घरी पोहचू शकेल का, याकडे आता जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
 
जिल्ह्यातील रस्त्यांची स्थितीही राज्याप्रमाणे बिकट झाली आहे. बहुतांश रस्ते धड दुचाकीही चालवण्यायोग्य राहिल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. त्यातच आतापर्यंत बहुतांश रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सरधोपट माती मिश्रीत मुरूम टाकून जनसामान्यांचा दुचाकीवरील प्रवास आणखी जीवघेणा झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने तयार केलेल्या निकषानुसारच खड्डे बुजवण्यासाठी शासनाने बांधकाम विभागाला दिशानिर्देश जारी केले आहे. त्यामुळे देयके अदा करण्यासाठी खड्डे भरण्यापुर्वी नंतरचे छायाचित्र कंत्राटदाराला सादर करावे लागणार आहे. 

यात खडी, डांबराचा दर्जा, आकारमानही ठरविण्यात आले. शासनाच्या या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यावर टाकण्यात आली आहे. परंतु संबंधित यंत्रणा या निकषानुसारच खड्डे बुजवून रस्त्यावरील अपघात टाळण्यास मदत करेल काय याकडे आता जिल्ह्यातील जनसामान्यांचे लक्ष लागले आहे. 
 
दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजताना वापरलेले साहित्य एवढे कमकुवत असते की, एका पावसातही ते पूर्णत: वाहून जाते. ही बाब गंभीरतेने घ्यावी. खड्डे बुजविताना पक्के साहित्य वापरावे. माती कचखडीचा वापर करू नका असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, मुंबईत असाच प्रकार घडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तेव्हा हायकोर्टाने सहा मोठ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित केली होती. असा प्रकार अमरावती शहरातील खड्डे बुजताना घडल्यास मुंबई पॅटर्न राबवू, असे तोंडी आदेश देण्यात आले. 
 
प्राधिकरणाकडे थेट तक्रारी दाखल करा 
राज्यातील रस्त्यांची झालेली भीषण अवस्थेची मुबंई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे राज्या विधी सेवा प्राधिकरणाने सर्वसामान्यांच्या तक्रारीला दाद मिळावी यासाठी विशेष कक्ष निर्माण केला आहे. महानगर पालिका नगरपालिका अंतर्गंत येत असलेल्या रस्त्याबाबतच्या तक्रारी प्राधिकरणाकडे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने तर त्यात आणखीच भर टाकली आहे. शहरातील नुकत्याच झालेल्या काही रस्त्यांचे तर यंदा अत्यल्प झालेल्या पावसाने पितळ उघडे केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...