आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडीएमसीच्या चार डॉक्टरांचे राजीनामे, बालरुग्ण विभागात आता डाॅक्टरच नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार बालकांच्या मृत्यूनंतर चर्चेत अालेल्या डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) बालरुग्ण विभागातील सर्वच चार डॉक्टरांनी बुधवारी (१२ जुलै) सामुहिक राजीनामे दिले. आकस्मिक सेवा लावल्याने विभाग प्रमुखांसह चार डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. प्रतिभा काळे, डॉ. श्रीपाद जहांगीरदार, डाॅ. पंकज बारद्धे डॉ. नरेश तायडे आदी चार डॉक्टरांकडून राजीनामा देण्यात आला. बालरुग्ण विभागात कार्यरत असलेल्या चार ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आकस्मिक कर्तव्य बजाविण्याबाबत विभाग प्रमुख डॉ.प्रतिभा काळे यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र, आकस्मिक सेवा देण्याचे आदेश प्राप्त होताच बालरुग्ण विभागातील सर्वच डॉक्टरांनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले. पीडीएमसीच्या बालरुग्ण विभागात काही दिवसांपूर्वी बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभाग तसेच पोलिस विभागाकडून केले जात आहे. या प्रकरणात तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. राजेश निस्ताने यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या पथकाला ज्या ठिकाणी बाळांना ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी ‘स्टॅफिलोकॅकस ओरिअस’ नावाचे जिवाणू असल्याचे चाचण्यांमधून आढळून आले होते.
 
एनआयसीयूमध्ये चार नवजात बालकांच्या मृत्यू झाल्यानंतर येथील अव्यवस्था चव्हाट्यावर आली. पीडीएमसीच्या एनआयसीयू विभागात तज्ज्ञ डॉक्टर आकस्मिक सेवा देण्याचे टाळत असल्याचे या राजीनामा नाट्यावरुन दिसून येत आहे. बालरुग्ण विभागात आकस्मिक सेवा देण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वच डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. मागील १० पेक्षा अधिक वर्षांपासून सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे राजीनामे अद्याप मंजूर करण्यात आलेले नाही. राजीनामे मंजूर करण्याची विशिष्ट प्रक्रिया असल्याची माहिती आहे. राजीनामे दिल्याने तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बालरुग्ण विभाग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसामान्य रग्ण पीडीएमसीमध्ये उपचार घेतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून अश्या प्रकारे पवित्रा घेतल्या जात असल्याने नवख्या डॉक्टरांच्या हातात रुग्णांना हवाली केले तर जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
केलेजात आहे. या प्रकरणात तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. राजेश निस्ताने यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या पथकाला ज्या ठिकाणी बाळांना ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी "स्टॅफिलोकॅकस ओरिअस’ नावाचे जिवाणू असल्याचे चाचण्यांमधून आढळून आले होते. जवळपास १२ ते १५ वेळा ते जिवाणू आढळून आलेत. यावरून डॉ. भूषण कट्टा यांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे अहवालात नमूद आहे. एनआयसीयूमध्ये चार नवजात बालकांच्या मृत्यू झाल्यानंतर येथील अव्यवस्था चव्हाट्यावर आली. पीडीएमसीच्या एनआयसीयू विभागात तज्ज्ञ डॉक्टर आकस्मिक सेवा देण्याचे टाळत असल्याचे या राजीनामा नाट्यावरुन दिसून येत आहे. बालरुग्ण विभागात आकस्मिक सेवा देण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वच डॉक्टरांनी राजीनामा दिल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. मागील १० पेक्षा अधिक वर्षांपासून सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे राजीनामे अद्याप मंजूर करण्यात आलेले नाही. राजीनामे मंजूर करण्याची विशिष्ट प्रक्रिया असल्याची माहिती आहे. राजीनामे दिल्याने तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बालरुग्ण विभाग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडगंज संपत्ती नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील रग्ण पीडीएमसीमध्ये उपचार घेतात. माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने गरीब तसेच सामान्य जनता येथे वैद्यकीय उपचाराकरीता दाखल होतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून अश्या प्रकारे पवित्रा घेतल्या जात असल्याने नवख्या डॉक्टरांच्या हवाली रुग्णांना केले तर जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आकस्मिक सेवा लावल्याने राजीनामे 
^मागील दहावर्षा पेक्षा अधिक कालावधीपासून बालरुग्ण विभागात सेवा देणाऱ्या चार डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. विभाग प्रमुखांकडून आकस्मिक सेवा लावण्यात आल्याने राजीनामा देण्यात आला. डॉक्टरांचे राजीनामे मंजूर करण्यात आलेले नाही. पर्यायी व्यवस्था हाेईपर्यंत बालरुग्ण विभाग तात्पुरता बंद राहणार आहे. डॉ.दिलीप जाणे, डीन, पीडीएमसी. 
बातम्या आणखी आहेत...