आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : पैसे आणण्यासाठी दोन विवाहितांचा छळ, लोणी, वरुड येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अमरावती - मुलगीही दोन्ही घरची लक्ष्मी असते असे म्हणतात. मात्र याच लक्ष्मीचा क्षुल्लक कारणासाठी सासरी छळ करीत तिचे जगणे मुश्किल केले जाते. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन विवाहितांचा शारीरिक मानसिक छळ केल्याच्या घटना लोणी वरुड पोलिस ठाण्यांतर्गत घडल्यात. 

२९ वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर पतीसह सासरच्या अन्य एका सदस्याने संशय घेऊन तिचा शारीरिक मानसिक छळ केल्याची घटना लोणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जावरा येथे घडली. या प्रकरणी वैशाली अरुण खंडार (२९) रा. जावरा हिने पती अरुण त्र्यंबकराव खंडार अन्य एका विरुद्ध लाेणी पोलिसात तक्रार दाखल केली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दुसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला, तर वरुड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विवेकानंद कॉलनी परिसरातील अश्विनी सुरज कासुरदे नामक विवाहितेने पती सासरच्या अन्य दोन मंडळींविरुद्ध माहेरवरून पैसे आणण्यासाठी शारीरिक मानसिक त्रास दिल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. 
पती सुरज प्रकाशराव कासुरदे सासरची दोन मंडळी हे फिर्यादीला तू आम्हाला पसंत नाही, लग्नात मानपान झाला नाही या कारणावरून त्रास देत माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दिली. या प्रकरणी वरुड पोलिसांनी विवाहित फिर्यादीच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...