आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपोस्ट डेपोतील दोन ते अडीच टन प्लास्टिकचा दररोज होतेय निचरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कंपोस्ट डेपोतील दोन ते अडीच टन प्लास्टिकवर दररोज प्रक्रिया केली जात आहे. महापालिकेच्या “प्लास्टिक प्राेसेसिंग युनीट’मध्ये ही प्रक्रिया केली जात अाहे. या प्रकल्पात प्लास्टिकचा निचरा होत असल्याने अमरावतीने प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. 
 
अमरावती बडनेरा शहरातून गोळा झालेला कचरा सुकळी येथील कंपोस्ट डेपो येथे टाकला जाताे. महापालिकेचा सुकळी येथील कंपोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तातडीने सुरू करणे गरजेचे असताना दहा वर्ष प्रकल्प रखडला. मात्र एक वर्षापूर्वी नागपूर येथील वेस्ट बिन सोल्युशन या कंपनीला कंपोस्ट डेपो येथे प्लास्टिक प्रोसेसिंग युनीटचा कंत्राट देण्यात आला. मागील वर्षी ऑक्टोबर २०१६ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात अाला. शहरातून प्लास्टिक कचरा स्वतंत्र येत नसल्याने प्रकल्प चालविणे कठीण झाले होते. मात्र, नामी शक्कल लढवित कचरा डेपोतून प्लास्टिक गोळा करीत त्यावर प्रक्रिया करणे सुरू झाले आहे. सुरूवातीला कमी असलेला प्रोसेसिंगचा वेग हळूहळू वाढला आणि सद्यस्थितीत ते अडीच टन प्लास्टिकवर दररोज प्रक्रिया होऊ लागली. कंपोस्ट डेपो येथून गोळा करण्यात आलेल्या पन्नी तसेच प्लास्टिकवर प्रक्रिया करीत गाठी तयार केल्या जातात. कंपोस्ट डेपाे येथून गाठी तयार करीत प्यूरीफायर तसेच अन्य कंपन्यांकडे पाठविल्या जातात. शुद्धीकरण करण्यात आलेल्या प्लास्टिकचा पूनर्वापर करणे शक्य होते. महापालिका प्रशासनाने देखील अमरावतीला देशातील पहिल्या शंभर शहरामध्ये समावेश करण्याचा चंग बांधला आहे. स्वच्छतेचा या मोहिमेत प्लास्टिक प्राेसेसिंग यूनीट अत्यंत महत्वाचा ठरणार यात शंका नाही.
 
प्लास्टिक प्रोसेसिंग ‘सिम्प्ली सिटी’ प्रकल्प 
घनकचरा व्यवस्थापनात अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती शहरात प्लास्टिक प्रोसेसिंग यूनीट ‘सिम्प्ली सिटी’ प्रकल्प ठरताे अाहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबतच १६ हजार रुपये दर माह रॉयल्टीचे उत्पन्न देखील महापालिकेला प्राप्त होत आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...