आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ कोटींच्या ‘पीएमसी’चा प्रस्ताव ‘स्थायी’ ने फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - छत्री तलाव सौंदर्यीकरण करण्याचा प्रशासनाकडून आलेला २५ कोटी रुपयांच्या पीएमसी(प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सटंंट )चा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीकडून फेटाळण्यात आला. छत्री तलाव पर्यटन विकासाच्या दृष्टिने पीएमसी नेमणुकीसाठी फेरनिविदा करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी मंगळवारी (१२ जुलै) दिल्या. 
महापालिका बांधकाम विभागाकडून पीएमसी नेमणूक करण्याकरीता पूनर्सादरीकरण करण्याबाबत मंगळवारी (११जुलै) पार दुपारी वाजता पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. निविदा प्रक्रियेत कमी दर असलेल्या एजन्सीच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. दर कमी असल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवित पीएमसी नेमण्यात यावी, असे स्थायी समितीचे म्हणणे आहे. बांधकाम विभागाकडून ठेवण्यात आलेला प्रस्ताव स्थायी समितीकडून फेटाळण्यात आला. शहरालगत पाेहरा जंगल क्षेत्रात निसर्गाने नटनेल्या परिसरात छत्री तलाव आहे. शहराला लागून असलेल्या छत्री तलावाचे सौंदर्यीकरण करीत पर्यटन विकास करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. मात्र राजकीय हेव्या-दाव्या पोटी छत्री तलावाचा विकास मागील अनेक वर्षांपासून खुंटला आहे. बडनेरा मतदार संघातील आजी माजी आमदारांमध्ये छत्री तलावाच्या विषयाला घेऊन शहरात सुरू असलेले शीतयुद्ध जगजाहीर आहे. या संघर्षात छत्री तलावाचे साैंदर्यीकरण करण्याचे डाव आखले जात आहे. शहरातील महत्वपूर्ण प्रकल्प असताना महापालिकेला डावलत तसेच निविदा प्रक्रिया राबवित परस्पर कामे होत असल्याची धक्कादायक तेवढीच गंभीर बाब देखील समोर आली. १०० कोटी रुपयांचा असलेल्या छत्री तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पाचा विकास अाराखडा तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्ती करण्यावरुन वाद निर्माण झाल्याची बाब समोर आली. 
गुरुवार २९ जून रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पीएमसी नियुक्ती तसेच निविदा प्रक्रिया राबविता छत्री तलावातील गाळ काढण्याचे तब्बल ७५ लाख रुपयांचे काम देण्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. 

म्हणून फेटाळला प्रस्ताव 
^निविदा प्रक्रियेत कमी दराच्या एजन्सीच्या प्रकल्प सादरीकरणाची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र दर कमी असल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून पीएमसी नियुक्त करावी म्हणून बांधकाम विभागाने ठेवलेला प्रस्ताव फेटाळला आहे. तुषार भारतीय,सभापती,स्थायी समिती,मनपा. 

शासनाकडून मिळाले १२.५० कोटी 
प्रकल्प अहवाल तयार करण्यापूर्वी मुलभूत सुविधे अंतर्गत छत्री तलाव विकासाकरीता शासनाने १२.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शासनाच्या निधीतून गाळ काढण्याचे ७५ लाख रुपयांचे कार्य आरंभ करण्यात आले. मात्र या कामाची निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. 
बातम्या आणखी आहेत...