आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्... ‘त्या’ वेडसर महिलेची अब्रु वाचली, पोलिस प्रशासनाचे अक्षम्य झाले दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - रविवारी दुपारी पासून वणी शहराच्या रस्त्यावर बेवारस फिरत असलेल्या बुरखा घातलेल्या एका वेडसर महिलेला दुचाकी स्वारांनी बसवून नेण्याचे प्रयत्न केले असता टिळक नगर येथील महिलांच्या सजगतेमुळे त्या दुचाकी स्वाराला पळून जावे लागले त्यामुळे त्या वेडसर महिलेची अब्रु वाचली. विशेष म्हणजे घडलेल्या घटनेबाबत तसेच वणी शहरात रविवार पासून तर रात्र भर बुरखा घातलेली एक अनोळखी महिला फिरत असल्याबाबत पोलिसांना मोबाईलवर सूचना तसेच मोबाईलवर महिलेच्या फोटोसह व्हाटसअॅप करुनही पोलिसांनी साधी चौकशीसुद्वा केली नाही. 
 
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री पर्यंत रस्त्यावर एक काळा बुरखा घातलेली अंदाजे ४० वर्षांची महिला फिरत असतांना अनेक लोकांनी पाहिले. तसेच सकाळी ही महिला जैताई मंदीर परिसरात एका दुकानाबाहेर बसुन होती. त्याचवेळी एक दुचाकी स्वार व्यक्ती महिलेजवळ आला त्याने माझ्यासोबत चल, असा आग्रह धरला. मात्र त्या महिलेने त्याला काही प्रत्युतर दिले नाही. थोड्यावेळाने महिला तेथून उठून इकडे तिकडे फिरु लागली. त्यावेळी तो दुचाकीस्वार व्यक्ती परत आला त्याने महिलेला मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच जैताई मंदीर परिसरात असलेल्या काही घरातील महिला बाहेर निघाल्या. त्यांनी हा प्रकार पाहून महिलेला ओढणाऱ्या करणाऱ्या त्या व्यक्तीला हटकले. महिला त्या ठिकाणी आल्याचे पाहून तो दुचाकीस्वार त्या ठिकाणावरून पसार झाला. त्यानंतर त्या महिलेला नागरिकांनी विचारपूस केली असता ती पुसदची असून, आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिला दोन मुल असल्याची माहितीही तिने दिली. देशात दररोज कुठे कुठे आतंकवादी घटना घडत असताना बुरखा घातलेली अनोळखी महिला दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यावर संशयितरित्या फिरत असूनही पोलिस विभाग मात्र झोपेत असल्याचे दिसून आले. टिळकनगर येथील महिलांच्या सजगतेने या महिलेची अब्रु वाचली नाही तर पोलिस प्रशासनाच्या भरवश्यावर बसले असता त्या महिलेसोबत काहीही अनुचित घटना घडली असती अशी चर्चा आता महिलांमध्ये सुरू आहे. 
 
पोलिस प्रशासनाचे अक्षम्य झाले दुर्लक्ष 
रात्र भरपासून शहरातील रस्त्यावर फिरत असलेल्या महिले बाबत येथील ठाणेदारांच्या व्हाट्सअप नंबरवर फोटोसह माहिती देण्यात आली तसेच ही घटना घडल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसांना दूरध्वनी वरुन कळवले. मात्र पोलिस कर्मचा ऱ्यांकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. तसेच एकही पोलिस कर्मचारी घटनास्थळी आला नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...