आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांमध्ये १६ निलंबित;१०० नोटीस,शिस्त लावण्यासाठी सीपींची ऐतिहासिक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस आयुक्तालयात कार्यरत कर्मचारी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी मागील पाच महिन्यांमध्ये १६ पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, याचदरम्यान सुमारे शंभर अधिकारी कर्मचारी यांना वेतनवाढ थांबवण्याबाबत नोटीस बजावली आहे. दरम्यान, या कारवाईचा पोलिसांनी धसका घेतला असून, अवघ्या पाच महिन्यांत १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करून शंभर जणांना नोटिस पाठवण्याची ही कारवाई आयुक्तालयाच्या इतिहासात ऐतिहासिक ठरली आहे.

पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक १५ जानेवारी २०१६ ला अमरावती आयुक्तालयात रुजू झाले. रुजू झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात दोषी आढळलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. १५ जानेवारी ते जून २०१६ या काळात त्यांनी आयुक्तालयातील चार पोलिस उपनिरीक्षक तसेच १२ कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच विविध प्रकरणात ठपका ठेवून सुमारे शंभर अधिकारी, कर्मचारी यांना वेतनवाढ रोखण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहे. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये काही ठाणेदारांचाही समोवश आहे. पोलिस आयुक्तांनी शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांचा कारवाईचा धडाका अजूनही सुरूच आहे.

आरोपीसोबतसंपर्क करणारा पोलिस मुख्यालयात संलग्न : नागपुरीगेट ठाण्यात असलेला सध्या पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकात कार्यरत असलेल्या पोलिस नाईक जयसिंग ठाकूर यांनी एका मारहाण प्रकरणातील आरोपींसाेबत परस्पर संपर्क साधला. दरम्यान, नागपुरी गेटचे पीएसआय संजय आत्राम यांनी त्या आरोपीला अटक केली. त्या वेळी ठाकूर पीएसआय आत्राम यांच्यात वाद झाला.

हे प्रकरण पोलिस आयुक्तांकडे आले होते. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी जयसिंग ठाकूर यांना मुख्यालयात संलग्न केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १०) करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी केलेली या धडक कारवाईमुळे शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे.

ठोसरे वलगावचे प्रभारी ठाणेदार
बदलीझाल्यामुळे व लगावला मागील काही दिवसांपासून ठाणेदार म्हणून कार्यरत रणवीर बयेस तसेच पोलिस निरीक्षक कुमार आगलावे यांना शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे वलगाव ठाणेदार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पीआय अर्जुन ठोसरे यांना प्रभार देण्यात आला. तसेच पाच महिन्यांत १६ जणांना निलंबित करून सुमारे १०० जणांना नोटीस बजावली आहे.शिस्तीसाठी ही कारवाई केली आहे. मोरेश्वर आत्राम, पोलिसउपायुक्त.
बातम्या आणखी आहेत...