आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन अडवल्यामुळेे सेवानिवृत्त फौजदाराची पोलिसांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मालटेकडीजवळ असलेल्या पोलिस पेट्रोलपंपवर एक सेवानिवृत्त फौजदार दुचाकी घेऊन जात होते. याच वेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडवून राँग साइड जाण्यास मज्जाव केला. या वेळी सेवानिवृत्त फौजदाराने वाद घालून मी सेवानिवृत्त अधिकारी आहे, मला कसे अडवता दंड करता, असे म्हटले. यावरून उद््भवलेल्या वादातून सेवानिवृत्त फौजदाराने पोलिस शिपायांना मारहाण केली. दगडही मारले. १७ ऑक्टोबरला भररस्त्यावरच ही हाणामारीची घटना घडली.

रविकांत सुलाभराव ढोके (वय ५९) रा. वडाळी, असे सेवानिवृत्त फौजदाराचे नाव आहे. ढोके हे शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एम. एच. २७ आर ९२४७) पोलिस पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी राँग साइडने जात होते. याठिकाणी फ्रेजरपुरा वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलिस शिपाई सचिन श्रीवास (ब. नं. १३५९) आणि दिलीप रत्नपारखी (ब. नं. ९४८) हे कार्यरत होते. ढोके राँग साइड आल्यामुळे श्रीवास यांनी त्यांना अडवले राँग साइड आल्यामुळे दंड घ्यावा लागेल, असे सांगितले. या वेळी ढोके यांच्यातील फौजदार जागा झाला. काही वेळातच हाणामारीला सुरुवात झाली. त्या वेळी ढोके यांनी श्रीवास यांचा शर्टही फाडला. हा वाद सोडवण्यासाठी त्याच पाॅइंटवर असलेले दिलीप रत्नपारखीसुद्धा मध्यस्थी करण्यासाठी आले, त्यांनाही मार खावा लागला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून रविकांत ढोकेविरुद्ध शासकीय कामात अडथळा, पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस श्रीवास रत्नपारखी यांनीही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप ढोके यांनी केला होता.
पोलिसांना मारहाण करताना सेवानिवृत्त हवालदार.
सेवानिवृत्त फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल
^सेवानिवृत्तफौजदाराने मारहाण केल्याबाबत तक्रार वाहतूक पोलिसांनी दिली आहे. या तक्रारीमुळे आम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कैलाशपुंडकर, ठाणेदार,गाडगेनगर.