आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमोद हरकुट आत्महत्येचा ‘ईओडब्ल्यू’ करणार तपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील औषध व्यावसायिक प्रमोद हरकुट यांनी एप्रिलला घरातच आत्महत्या केली होती. मात्र, अजूनही राजापेठ पोलिसांनी काही कारवाई केली नाही, असा आरोप करून त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी (दि. २०) पोलिस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांच्याकडे तक्रार केली. सदर प्रकरणाचा तपास ‘ईओडब्ल्यू’ किंवा गुन्हे शाखेकडून करण्यात यावा, अशी मागणीसुद्धा केली आहे. त्यामुळे आता पोलिस आयुक्तांची परवानगी घेऊन हा तपास ‘ईओडब्ल्यू’कडे देण्यात येणार आहे.

प्रमोद हरकुट यांनी एका मालमत्तेचा व्यवहारापोटी त्यांनी इसारापोटी त्या व्यक्तींना सुरुवातीला लाख रुपये आणि नंतर २० लाख रुपये दिले होते. दरम्यान, हा व्यवहार करण्यासाठी हरकुट यांनी त्यांच्या राहत्या घराच्या विक्रीचा व्यवहारसुद्धा अन्यत्र केला होता. मात्र, इसार घेणाऱ्यांनी आम्ही लाख रुपयेच घेतले, असा उल्लेख इसार चिठ्ठीवर केला, कारण उर्वरित २० लाख रुपये विश्वासावर प्रमोद हरकुट यांनी दिल्याचेही त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. मात्र, २० लाखाने फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दबाव येत असल्यामुळे त्यांनी जूनला घरातच विष घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, या घटनेनंतर आठ दिवसांनी प्रमोद हरकुट यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी कुटुंबीयांना मिळाली होती.
बातम्या आणखी आहेत...