आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्षाच्या नातेवाईकांची पोलिस आयुक्तांकडे न्याय देण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- चार-चार तक्रारी देवूनही राहुल भडविरुध्द फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाई केली नाही. यातच २३ नोव्हेंबरला त्याने प्रतिक्षाचा भर रस्त्यात खून केला आहे. प्रतिक्षाच्या या मारेकऱ्याला शिक्षा झालीच पाहीजे तसेच तक्रारींची दखल घेणाऱ्या फ्रेजरपुरा पोलिसांविरुध्द कारवाईची मागणी प्रतिक्षा मेहत्रेच्या नातेवाईकांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. सोमवारी (दि. २७) नातेवाईकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. 

 

राहुलने मागील सहा महिन्यांपुर्वी कौंटूबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. दरम्यान प्रतिक्षा पत्नी असल्याचा दावा राहुल करत होता मात्र प्रतिक्षा किंवा तीच्या कुटूंबियांनी ते अमान्य करून राहुलने पोलिसात किंवा इतरत्र दिलेले कागदपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. याच बनावट कागदपत्राच्या आधारे तो फोनवरून, घरी येवून तसेच नातेवाईकांकडे जावून धमक्या देत होता. तसेच प्रतिक्षाला रस्त्यात गाठून धमक्या देत होता. या प्रकरणात वारंवार पोलिसात तक्रार दिल्यात. मात्र फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसुध्दा केली नाही. त्यामुळे दोषी असलेल्या पेालिसांविरुध्द कारवाई झाली पाहीजे. तसेच राहुल भड प्रकरणाचा तपास परिपुर्ण करावा जेणेकरून त्याला शिक्षा मिळावी असेही त्यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले. यावेळी प्रतिक्षाची बहीण समिक्षा, वडील, मामा दिलीप कावलकर तसेच कॉग्रेसच्या अर्चना सवाई परिसरातील नागरीक मोठ्या संख्येत हजर होते. 

 

ते कागदपत्र बनावटच असल्याचा आरोप 
राहुलभडने प्रतिक्षासोबत विवाह केल्याचे सादर केलेले प्रमाणपत्र तसेच दोघांचा सोबत असलेला फोटो पुर्णत: बनावट आहे. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने प्रतिक्षाचा छळ केला. असा आरोप प्रतिक्षाची बहीण समिक्षाने केला आहे. राहुलने तीला धमक्या दिल्या. इतकेच नाही तर त्याने माझ्या बहिणीचा खुन केला आहे. तीला न्याय मिळालाच पाहीजे. असेही समीक्षाने म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...