आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात पावसाचे पुनरागमन, पिके तरारली, तीन जण गेला वाहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/ नागपूर- तब्बल दीड महिना गायब होऊन बळीराजाचा अंत पाहणाऱ्या वरुणराजाने विदर्भात सोमवारी रात्रीपासून दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे मृत्युपंथाला लागलेल्या पिकांमध्ये उभारी आली असून अन्नदात्या बळीराजाच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, नागपूर जिल्ह्यांसह विदर्भाचा बहुतांश भाग मंगळवारी चिंब झाला. दरम्यान, नदी- नाल्यांना ओलेल्या पुरात अमरावती जिल्ह्यात दोघे तर यवतमाळ जिल्ह्यात एक जण वाहून गेला.

मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विभागातील सर्वाधिक २८.१ मिमी पावसाची नोंद अमरावती जिल्ह्यात करण्यात आली. त्याखालोखाल अकोला १६.८, बुलडाणा १२, यवतमाळ ८.६ आणि वाशीममध्ये ५.९ मिमी एवढा पाऊस झाला. अमरावती विभागातील पावसाची सरासरी १४.३ आहे. उपराजधानी नागपूर शहरही दमदार पावसामुळे चिंब झाले. पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर पाऊस परतीच्या मार्गाला लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ११ ते १२ ऑगस्टदरम्यान, पुन्हा कमी दाबाचे वारे निर्माण होऊन विदर्भाला पाऊस देतील, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती. दुपारपर्यंत वरूणराजा चांगला बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले. तापी आणि पूर्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाची जलपातळी वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी धरणाचे ३६ दरवाजे १ मीटरने उघडून, नदीपात्रात प्रतिसेकंद १९८० क्युमेक्स वेगाने विसर्ग करण्यात आला.

सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थानासह, विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली. या धरणात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता २२२. ०० दलघमी जलसाठा होता, तर २१०.७०० मीटर पातळी कायम होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पाऊस झाला. तर चिखलदरा परिसरात पाऊस झाल्याने जलपातळी आणखी वाढू शकेल.

अकला शहरात मंगळवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. शाळकरी विद्यार्थ्यांनी दप्तर, वॉटर बॅगसह छत्रीचा डोलारा सांभाळत शाळेचा रस्ता धरला हेता. छाया : नीरज भांगे