अमरावती- गेल्याबारा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याने मागील दहा वर्षांचा विक्रम मोडला असून, आतापर्यंत ५५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चालू मान्सूनमध्ये आजपर्यंत ५१४ मिलिमीटर पाऊस पडावयाचा होता. प्रत्यक्षात तो त्यापेक्षा जास्त झाल्याने सरासरी पर्जन्यमान १०८.६ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे.
सुरुवातीच्या काळात गायब झालेल्या पर्जन्यमानाचे जोरदार कम बॅक झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत पर्जन्यमानाने सरासरी गाठली होती. त्यामुळे पिकांची स्थिती सुधारण्यासोबतच जिल्हाभरातील नदी-नाले जलाशये तुडुंब भरली आहेत. धरणातील जलसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला असून, िवहिरींची पातळीही बऱ्यापैकी वर आली आहे. दरम्यान, गेल्या बारा दिवसांपासून तो सतत बरसत असल्यामुळे गुरुवारी पावसाने दहा वर्षांची सरासरी ओलांडली आहे.
जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हिल स्टेशन’ चिखलदरा येथे सर्वाधिक ९५१.४ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. एक जून ते १३ ऑगस्ट २०१५ पर्यंतची ही स्थिती असून, त्यापेक्षा कमी ७३२.८ मिमी पाऊस मेळघाटातील दुसरा तालुका असलेल्या धारणीत नोंदला गेला. या आकड्यामुळे धारणी तालुका जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर थांबला आहे.
कोणतीही जीवित हानी नाही
शहरभरसकाळपासूनच पाऊस सुरू आहे. त्यातच दुपारच्या सुमारास विजा कडाडण्याचा आवाजही होऊ लागला. मात्र, या पावसामुळे कोणतीही मानवी हानी झाली नाही. पडझड आणि मोठ्या नुकसानाचीही कोणती घटना झाल्याचे ऐकिवात नाही. -चंदन पाटील,उपायुक्त तथा नैसर्गिक आपत्ती विभागप्रमुख.
जनजीवन विस्कळीत, शाळांना सुटी
संततधारपावसामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही भागांतील शाळांना लागोपाठ तीन दिवसांपासून सुटी मिळाली आहे. ऐन शाळा भरण्याच्या वेळीच जलधारा कोसळत असल्याने प्राथमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी शाळांपासून वंचित झाले असून, तीन दिवसांनंतर या स्थितीत थोडीफार सुधारणा आली आहे.
गुरुवारीकोसळला सात मिमी पाऊस : कडाक्याचाआवाज आणि लख्ख प्रकाशासह कोसळणाऱ्या विजांसह आज, गुरुवारीही जिल्ह्यात सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक २४.७ मिमी पाऊस संत्रा बागांसाठी प्रसिद्ध (कॅलिफोर्निया) वरुड तालुक्यात बरसला असून, सर्वात कमी शून्य मिलिमीटर पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात नोंदला गेला. अमरावतीत भरवस्तीत आज दुपारी वीजही कोसळली. या विजेमुळे मानवी हानी टळली असली, तरी जिल्हा उद्योग केंद्राच्या इमारतीच्या स्लॅबला मोठे िछद्र पडले आहे. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा अपघात घडला.