आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात सर्वत्र मध्यम पाऊस, तब्बल दीड महिन्यानंतर पावसाची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून सर्वत्र मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. सातपुड्याच्या रांगामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने वरूड-नागपूर मार्गावरील ठप्प झाली. नदीच्या पुराचे पाणी घुसून सुरळी, उराड, जरूड येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
वाठोडा येथील बेल नदीच्या पुरामुळे नागपूरमार्गावरील वाहतूक सुमारे सात तास बंद होती. शिरजगाव कसबा येथे घर कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाले. पावसाच्या हजेरी मुळे मात्र भुसार पिकांची पेरणीची वेळ निघून गेल्याने आता नेमके काय पेरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 
 
बुधवारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणात पेरण्या शिल्लक आहे. त्यातच मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी, तूर आदीचाच पर्याय शिल्लक आहे. दरम्यान, सातपुड्याच्या रांगामध्ये रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरुड तालुक्यातील झिरी, बेल, चुडामन, वर्धा, पाक, धवलगीरी नदीसह नाल्यांना पूर आला. झिरी नदीच्या पुराचे पाणी सुरळी तर जरूड येथील टोकी नदीचे पाणी घरात घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवार ते बुधवार सायंकाळी वाजेपर्यंत तालुक्यात ८० मि.मी. पावसाची नोंद झाली. 
बातम्या आणखी आहेत...