आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलावंत कधीच निवृत्त होत नसतो, खा. रामदास तडस यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आता राजकारणात असलो आणि पूर्वी राजकारणातील विविध पदे भूषविली असली तरी माझा ओढा कलेकडे आहे. कलेत माझे मन नेहमीच रमते असे सांगतानाच कलावंत कधीच माजी होत नाही, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा येथे नीलकंठ अकॅडमी ऑफ सोशल अॅक्टिव्हिटी व युवक बिरादरी वर्धाच्या कलाविष्कार कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. स्थानिक धुनिवाले मठ येथील कार्यक्रमात अतिथी म्हणून सेन्सॉर बोर्ड सदस्य व अभिनेते-दिग्दर्शक संजय भाकरे, मिलिंंद भेंडे, अनिल नरेडी, इम्रान राही, प्रभाकर घाटे, दिनेश वडातकर आदी उपस्थित होते.

यावेळी संजय भाकरे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपण स्वतः एक खेळाडू आहो. आजूबाजूची माती आणून एक आखाडा तयार केला. त्यामध्ये रोज तालीम करून व परिस्थितीवर मात करून मी विदर्भ केसरी ते लोकसभेच्या खासदार पदापर्यंत मजल मारली. सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत, खेळाडूंना विसरू शकत नाही. मागील ६० वर्षापासून वर्धा जिल्ह्यात एकही सांस्कृतिक नाट्य गृह नाही ही खेदाची बाब आहे, असे खासदार तडस म्हणाले. नुकतेच देवळीला स्टेडियम व नाट्यगृहाचे भूमिपूजन केले. या प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शिवम घाटे यांचाही सत्कार करण्यात आला. या उद्घाटनानंतर संजय भाकरे फाऊंडेशनच्या ‘बाप हा बापच असतो’ या एकांकिकेचा प्रयोग सादर करण्यात आला. एकांकिकेला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
बातम्या आणखी आहेत...