आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीचे केले शोषण, पोलिस शिपायाला 10 वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
परतवाडा - पोलिस मुख्यालयी कार्यरत असताना एका परिचित अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. मात्र दुसऱ्याच युवतीशी लग्नाची गाठ बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिस शिपायाला अचलपूर न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. राहुल जानराव खडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 
 
आरोपी राहुल खडे हा अमरावती येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. त्या वेळी त्याने एका परिचित अल्पवयीन युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळीवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शोषण केले. मात्र काही दिवसातच दुसऱ्या युवतीशी लग्न जुळवले. याबाबत त्याने िपडीत युवतीला किंचितही भनक लागू दिली नाही. मात्र याबाबत अल्पवयीन मुलीला माहिती मिळताच तिने येवदा पोलिसात नोव्हेंबर २०१३ मध्ये तक्रार दाखल केली. बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. भोला चव्हाण यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या वतीने या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासण्यात आलेत. 

न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य परिस्थिती या दोन्ही बाबींवर बचाव पक्षाच्या वतीने वकीलांनी केलेला युक्तीवाद गृहित धरून आरोपी राहुल खडे याला १० वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच हजार रुपये दंडही ठोठावला आहे. दंड भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सुनावली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एच. मुळे यांनी केला होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...