आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात अन्न धान्य वाटपाचे काटेकोरपणे नियोजन करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आढावा बैठक-जिल्ह्यात अन्न धान्य वाटपाचे काटेकोरपणे नियोजन करा - Divya Marathi
आढावा बैठक-जिल्ह्यात अन्न धान्य वाटपाचे काटेकोरपणे नियोजन करा
अमरावती- विदर्भातीलसहा औरंगाबाद विभागातील सर्व अशा एकूण १४ जिल्ह्यांतील सर्व शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेची हमी प्राप्त होणार आहे. यासाठी अन्न धान्य वाटपाचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी आज, १३ ऑगस्टला दिले. १४ जिल्ह्यांत नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनेत वाढ होऊ नये, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा दारिद्र्यरेषेवरील शिधापत्रक (केशरी) लाभार्थ्यांनासुद्धा (एपीएल) तांदूळ रुपये गहू रुपये प्रती किलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनापासून हे वाटप सुरू केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुरवठा सचिव कपूर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अन्न धान्य वाटप करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. विभागातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रतिव्यक्ती किलो याप्रमाणे अन्न धान्याचा लाभ मिळणार आहे. याकरिता केंद्र शासनाकडून (इकॉनॉमिक कॉस्ट)ने दर्जाचा तांदूळ गहू खरेदी करून सदर शेतकऱ्यांना तांदूळ रुपये प्रती किलो गहू रुपये प्रती किलो या दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार सात/बाराधारक शेतकरी हे योजनेचे घटक आहेत. यासाठी सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपाबाबत गांभीर्याने राहण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. धान्य उपलब्ध नाही, असे प्रकार घडू नयेत. ज्या ज्या ठिकाणी संभ्रम निर्माण होईल किंवा अडचण येतील संबंधित शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन धान्य वाटप करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त (पुरवठा) मावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे तसेच विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी गित्ते यांनी पुरवठा सचिव दीपक कपूर यांचे स्वागत केले. जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शंभर टक्के आधार नोंदणी
देशातलाख ८० हजार कोटी रुपये धान्य वाटपावर खर्च होतो. यांतील १४ टक्के म्हणजे सुमारे १३ ते १४ हजार कोटी रुपये राज्यात खर्च होतात. आधार कार्ड नोंदणीमुळे बोगस तसेच डुप्लिकेट शिधापत्रिका कमी होतील, यातून किमान हजार कोटी रुपये तरी वाचणार आहेत. पंजाबमध्ये १०० टक्के आधार नोंदणीमुळे १५०० कोटी रुपयांची सीलिंग झाली आहे. राज्यात सुमारे १३ टक्के लोकांची आधार नोंदणी नाही. पुढील दोन महिन्यांत यूटीआयमार्फत स्वतंत्रपणे मोहीम राबवली जाणार आहे.

लाख शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
जिल्ह्यातलाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. यांपैकी लाख हजार ३३४ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच संख्या आहे. लाख हजार ३३६ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांची लोकसंख्या असून, या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची स्थिती अत्यंत वाईट असून, शासनाच्या या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.