आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसामध्ये शहरात सहा ठिकाणी चोरी, दुचाकी चोरी तर नित्याचीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सध्याशहरात चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. दुचाकी चोरी तर नित्याचीच झाली आहे. त्यापाठोपाठ शुक्रवार ते शनिवार दरम्यान चोरट्यांनी शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सहा ठिकाणी चोऱ्या करून जवळपास पावनेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

बडनेरा ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साईनगर भागातील द्वारकानगरातील दीपक अजाबराव सांबे (४१) हे शुक्रवारी (दि. ३) सांयकाळी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान शुक्रवार ते शनिवारदरम्यान अज्ञात चोरट्याने सांबे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील मंगळसूत्र हजारांची रोख असा ६२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच बडनेरा बसस्थानकातून यवतमाळ जाण्यासाठी आलेल्या विनायक हरिभाऊ डफाडे (४६ रा.अमर कॉलनी, अमरावती) यांच्या पत्नी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ३७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने हजार रुपये रोख असा ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी बहुद्देशीय शाळेतून लोखंडाच्या १०० प्लेट किंमत ३५ हजार रुपये चोरट्यांनी १५ ते २० जानेवारी दरम्यान चोरीला गेले होते. या प्रकरणी श्रीकांत अन्नाजी काळे (३४ रा. लक्ष्मीनगर) यांनी शनिवारी (दि. ४) गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच महेन्द्र कॉलनीमधील रहिवासी एका महीलेच्या घरात चोरट्यांनी शनिवारी (दि. ४) घरात प्रवेश करून १० हजार रुपयांची रोख लंपास केली. 

नागपूरी गेट ठाण्याच्या हद्दीतील रतनगंज भागातील एका महीलेच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी सिलींडर, मोबाईल, ३० साड्यांची बँग, कटलरी सामान पॅन्टमधील ११ हजार ६०० रुपये असे एकूण ३० हजार ६०० रुपयांचा ऐवज शुक्रवार ते शनिवारी दरम्यान लंपास झाला आहे. तसेच राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद स्टेट बँकेतील रहीवासी रमेश शिवराम वाघमारे यांच्या घरातून चोरट्यांनी (दि. ४) सायंकाळदरम्यान ही चोरी झाली आहे. यावेळी चोरट्याने वाघमारे यांच्या घराला लागलेले कुलूप त्याच ठिकाणी खिडकीत असलेल्या चाबीने उघडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी तब्बल १३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत लाख ३७ हजार रुपये) लंपास केले आहे त्यामुळे खळबळ माजली आहे. 
बातम्या आणखी आहेत...