आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णीत चोरट्याने उडवले दीड लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- शहरातीलबापू नगर परिसरात आज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नसताना कपाटामधील एक लाख ५६ हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली. यातील घर मालक कमलकीशोर दुर्गाप्रसाद सिंघानीया रा.बापू नगर आर्णी असे असून ते घरातील सदस्यांसोबत २३ जुलैला बाहेरगावी गेले होते. बाहेरगावावरून २१ ऑगस्टला घरी आले असता वरच्या मजल्यावरील दाराचे कोंडे तोडून आज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट मधिल एक लाख छपन्न हजार रोख चोरून नेल्याचे लक्षात आले.हि घटना २३ जुलै ते २० ऑगस्टच्या रात्री दरम्यान घडली असावी, असा अंदाज घर मालक कमलकिशोर सिंघानीया यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम चोरून नेली. मात्र दहा रूपये आणी चिल्लर पैशाला त्यांनी हात सुध्दा लावला नाही. यावेळी चोरट्यांनी कपाटामधील कपडे महत्त्वाच्या कागदपत्रांची नासधूस केल्याचे घटनास्थळी दिसून येत होते. सिंघानीया यांच्या गैरहजेरीत झालेल्या घरफोडीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी पेट्रोलींग करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेतील अज्ञात आरोपीविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश वळवी हे करीत आहे.
बापूनगरातील एका घरात चोरट्यांनी कपाटातील अस्ताव्यस्त केलेल्या वस्तू.