आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोहयो’च्या मजुरांना मजुरीची प्रतीक्षा, कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील जळका येथील नागरिकांनी रोजगार हमी योजने अंतर्गत येणारे बरेच काम केले आहे. असे असले तरी मागील काही महिन्यापासून काम करणाऱ्या मजुरांना मोबदलाच अदा करण्यात आला नाही. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात त्वरित तोडगा काढावा, या मागणीसाठी आज, 4 सप्टेंबर रोजी जळका ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सीईओंना निवेदन दिले. 
 
जळका गावात रोजगार हमी योजनेतून अनेक कामे केल्या गेली. जवळपास ८० मजूर याठिकाणी होते. या मजुरांच्या माध्यमातून परिसरात अनेक ठिकाणी काम करण्यात आले. मात्र, या कामाचा कुठल्याही प्रकारे मोबदला अदा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे, बोनस देण्याच्या नावाखाली प्रत्येक मजुरांकडून शंभर रूपये घेण्यात आले. हे जमा झालेले पैसे बोनसच्या स्वरूपात अदा करू, असे सांगण्यात आले होते. 

मात्र, या पैशाचाही थांगपत्ताच नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, पैसे उपलब्ध नसल्यामुळे मजुरी अदा करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी पैसे नियमित दिल्या जात आहे. रोहयो योजनेतून कामे केल्यानंतर अनियमित वेतन अदा केल्या जात आहे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी ह्यावर कुठल्याही प्रकारे तोडगा काढला नाही. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जळका ग्रामस्थांनी आज, दि. सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. 
 
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या अॅड. सिमा तेलंग (लोखंडे) तसेच गावातील अनघा सातारकर, सुलोचना सोनवणे, शोभा पुडके, मंजुळा सोनारखर, कलावती बावणे, मारुती बावणे, अजगर पठाण, श्रावण आष्टेकर, कवडू आजीकर, वसंता आत्राम, बयाबाई कुमरे यांच्यासह उपस्थित मजुरांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 
बातम्या आणखी आहेत...