आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: मेळघाटात कारमध्ये पकडले लाख 42 हजार रुपये रोख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडनेरा मार्गावर पकडली साडेतीन लाखांची रोख - Divya Marathi
बडनेरा मार्गावर पकडली साडेतीन लाखांची रोख
अमरावती - धारणीते बुऱ्हाणपूर मार्गावरील धुलघाट बस स्थानकाजवळ पोलिसांनी एका कारची झडती घेतली. त्यावेळी कारमध्ये असलेल्या एका बॅगमधून पोलिसांनी लाख ४२ हजारांची रोख जप्त केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७) सांयकाळी केली आहे. रोख असलेल्या कारमध्येच एका पक्षाचे प्रचार साहित्यसुद्धा मिळून आले. 
 
विजय राध्येश्याम मालविय (२८, रा. भोकरबर्डी) आणि सुपीत खेमचंद मालविय (३४, रा. धुलघाट) हे दोघे पोलिसांनी रोख पकडली त्या कारमध्ये होते. धुलघाट बसस्थानकाजवळ कारची (क्रमांक एम. एच. २७ एसी ३८८६) झडती घेतली त्यावेळी रोख मिळून आली. तसेच या कारमध्ये एका राजकिय पक्षाचे प्रचार साहित्य मिळून आले आहे. त्यामुळे ही रोखसुद्धा निवडणूकीशी निगडीत असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती सांगितले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. रोख मिळाल्यानंतर ही माहिती निवडणूक विभागाच्या फ्लाईंग स्कॉडला देण्यात आली त्यामुळे कार्यवाही हा स्कॉडच करणार असल्याचे सांगितले आहे. 
 
मेळघाटात याच कारमधून रोख रक्कम जप्त केली 
कांरजा लाडवरून अमरावती शहरात येणाऱ्या एका कारची अकोला ते बडनेरा मार्गावरील वेलकम पॉईन्टवर नाकाबंदी करणाऱ्या महसूल पोलिस पथकाने तपासणी केली. त्यावेळी या कारमधून साडेतीन लाखांची रोख मिळून आली. ही कारवाई (दि. १६) सांयकाळी घडली. दरम्यान सदर रोख संदर्भात संबधित व्यक्तीने गुरूवारी उशिरा रात्रीपर्यंत पथकाकडे कागदपत्र सादर केले नसल्यामुळे ही रक्कम जप्त करून बडनेरा पोलिसांच्या स्वााधिन करण्यात आली असल्याचे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...