आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमाकोरेगाव; विक्रमी मानवंदना! सायन्सस्कोर मैदानात उसळला भीमसागर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला स्थानिक सायन्सस्कोर मैदान येथे आयोजित कार्यक्रमात हजारो नागरिकांनी विक्रमी मानवंदना अर्पण केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्ष असल्याने अमरावतीत येथे या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी रहाटगाव ते सायन्सस्कोर मैदानापर्यंत मानवंदना फेरी काढण्यात आली.

पेशव्यांसोबत झालेल्या भीमाकोरेगाव येथील लढाईत समता सैनिकांनी विजय प्राप्त केला. अन्याय, जुलमी सत्तेचे प्रतीक पेशवाईविरोधात लढाईत शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अमरावती येथील सायन्सस्कोर मैदानात मागील काही वर्षांपासून भीमाकोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीला मानवंदना दिली जात आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान महाराष्ट्र शासनाने विकत घेण्यात मौलाची कामगिरी केल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा नागरी सत्कारदेखील या कार्यक्रमात करण्यात आला. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथाचे उद््घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डाॅ. अनिल बोंडे, महापौर रिना नंदा, भैयाची खैरकर, सचिन मून, राजू मून, नरेंद्र खैरकर, कैलाश मोरे, मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम, रमेश बनसोड, मुंबईचे आयकर अधिकारी अरविंद रामटेके, पुरुषोत्तम हरवानी, अरुण वानखडे, सुगत वाघमारे, नाना रौराळे यांची उपस्थिती होती. यानंतर छत्तीसगड येथील गायिका सीमा कौशिक यांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला.रात्री वाजता औरंगाबाद येथील कुणाल वऱ्हाडे यांनी ‘भारत की शान संविधान’, तर सीमा पाटील यांनी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला.

सव्वालाख युवकांना बनवणार समता सैनिक : समतासैनिक दलात सव्वा लाख युवकांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती भैया खैरकर यांनी िदली.

मानवंदनामध्ये आज ऐका ‘जलवा है’
भीमाकोरेगाव विजयस्तंभाच्या मानवंदना कार्यक्रमात, शनिवारी रात्री वाजता ‘जलवा है’ हा भीमगीकांचा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. नागपूरच्या विजया विनया जाधव या भगीनी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तत्पूर्वी सायंकाळी वाजता प्रसिद्ध प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी (नागपूर) यांचा ‘यह साल बाबासाहेब के नाम’ हा कार्यक्रम सादर होईल.
बातम्या आणखी आहेत...