आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीवर सुवर्ण वर्षाव, तब्बल ७७ सुवर्णपदकांवर ताबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अमरावतीच्या विद्यार्थ्यांवर सुवर्ण वर्षाव झाला. १४२ पैकी तब्बल ७७ सुवर्ण पदकांसह विविध पुरस्कारांवर ताबा मिळवून अमरावतीकरांनी सर्वच विद्याशाखांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. पदव्युत्तर मराठी विभागातील शीतल सुरेंद्र तायवाडे ही विद्यार्थिनी सहा सुवर्णपदके प्राप्त करून विद्यापीठात अव्वल ठरली.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ शनिवार (दि.२०) पार पडला. दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना १०१ सुवर्ण, २२ रौप्यपदके २४ रोख पारितोषिके, असे एकूण १४२ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पाच पुरस्कारांसाठी विद्यार्थी पात्र ठरले नाही. यंदाच्या दीक्षांत समारंभात एकूण ३३ हजार १७१ पदविकांक्षींना पदवी,तर ३१ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. सकाळी १० वाजता विद्यापीठ गीताने दीक्षांत सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व प्रथम विविध विद्याशाखेंतील संशोधकांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी वाङ््मय विद्याशाखेत ५२, वाणिज्य १९, विज्ञान ९१, शिक्षण ३५, समाजविज्ञान ८६, अभियांत्रिकी ४९, आयु:शल्य विज्ञान २, विधी ३, गृहविज्ञान अशी अाचार्य पदवी प्रदान करण्यात आली. उन्हाळी २०१५ मध्ये विद्यापीठाने ५७९ परीक्षा घेतल्या असून, यात एकूण ३,०३,०३३ परीक्षार्थी होते. त्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या १,७८,२७३ बहिःशाल विद्यार्थ्यांची संख्या १२,२२३ तर माजी विद्यार्थ्यांची संख्या १,१२,५३७ होती. ५१४ हिवाळी परीक्षांसाठी २,१६,३७० परीक्षार्थी बसले होते.

सातपुरस्कारांची भर : गुणवंतविद्यार्थ्यांच्या पुरस्कारामध्ये नव्याने सात पुरस्कारांची भर पडली आहे. ही सर्व सातही सुवर्णपदके यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीकडून दिली जाणार आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, काम्प्युटर सायन्स, इनफॉरमेशन टेक्नालॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, टेक्स्टाइल इंजिनिअरिंग,अभियांत्रिकी तांत्रिकी विद्याशाखेतून प्रथम येणाऱ्यांना हे पदक मिळतील.

दीक्षांत समारंभात अमरावती येथील संजय एकनाथराव काळे या अंध व्यक्तीने राजशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. पी. सी. काणे यांच्या मार्गदर्शनाखाली डोळसांनाही लाजवेल असे यश संजय काळे यांनी प्राप्त केले आहे.
डोळसांनाही लाजवणारे यश

अध्यापक होणार
गुणवत्तायादीतयावे म्हणून काही नियोजन केले नव्हते. वडिलांची इच्छा असल्याने हे यश प्राप्त करण्याचा मनी ध्यास होता. नियमित सराव जुन्या प्रश्नांची सोडवणूक करीत गेल्याने हे यश संपादन करता आले. यापुढे अध्यापन कार्य करणार आहे. यशाचे सर्व श्रेय विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, आई-वडिलांना आहे. शीतल तायवाडे, सर्वाधिकपदके प्राप्त, विद्यार्थिनी.
कुलगुरूंच्या हस्ते सर्वाधिक पदके स्वीकारताना शीतल तायवाडे.