आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या क्रीडा मोसमासाठी शाळांची कसरत सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नव्या शालेय क्रीडा मोसमात शासनाद्वारे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शाळांची कसरत सुरू झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुब्रतो मुखर्जी चषक फुटबाॅल स्पर्धेद्वारे २०१७-१८ च्या क्रीडा मोसमाला सुरुवात होणार असली तरी शारीरिक शिक्षकांनी या स्पर्धांवर बहिष्कार घातल्यामुळे संघ तयारकरण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे सध्या शाळांची चांगलीच कसरत सुरू आहे.  
 
शारीरिक शिक्षक हे नेहमीच खेळाडूंसाठी मोठा आधार राहिले आहेत. त्यांच्या भरवशावर खेळाडूंना राज्यच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेतही पाठवले जात होते. आता जर खेळाडू जिल्हा स्तरावरून विभाग राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला तर त्याच्यासोबत कोणता जबाबदार व्यक्ती द्यावा असा प्रश्न आहे. कारण शारीरिक शिक्षक हे प्रशिक्षक आणि काळजी वाहक म्हणून खेळाडूंसोबत अगदी मित्र, पालकांप्रमाणे असायचे. आता मात्र मैदानावरही संघ असला तरी त्यांच्यासोबत चुका सुधारण्यासाठी शारीरिक शिक्षक नसणार. त्यामुळे खेळाडूंमध्येही स्पर्धेबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही. जे खेळाडू क्लब किंवा वैयक्तिक खेळांचे प्रशिक्षण घेतात त्यांनाच आता स्पर्धेत स्वबळावर सहभागी व्हावे लागणार आहे. मुलींच्या संघांची काळजी घेण्यासाठी शाळांना आतापासूनच नेमके कोणाला पाठवावे असा प्रश्न पडला आहे. 

मर्यादित शिक्षकांच्या आधारे काम 
शासनाच्या क्रीडा शिक्षण विभागाने शारीरिक शिक्षकांचे तास (८ वी ते १० वी) चारवरून दोन असे कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक शाळांना मर्यादित शारीरिक शिक्षकांच्या आधारे तयारी करावी लागत आहे. मोठ्या शाळांचे कसेतरी भोगेल मात्र लहान शाळांना मात्र याचा चांगलाच फटका बसेल. सुमारे ९० खेळांपैकी ज्या खेळांमध्ये सहभाग घ्यायचा त्या खेळांची तयार करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...