आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीतील सात जणांना पकडले, महादेव खोरी परिसरातील पुलाखाली दडले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील महादेव खोरी परिसरातील एक्सप्रेस हायवेवर असलेल्या पुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास दडून बसलेल्या सात जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी पहाटे वाजताच्या सुमारास अटक केली आहे. यावेळी एक जण पसार झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सातही जणांकडून शस्त्र तसेच दरोडा टाकण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री मिळून आली आहे. 
 
जतीन गुरूसिंग ठाकूर (२८, रा. वडाळी), प्रज्वल ऊर्फ पज्जा प्रविण नाईक (२०, रा. यशोदानगर), आकाश अंबादास बन्सोड (२२, रा. वडाळी), मुकेश निळकंठ भगत (२८, रा. गजानन नगर),पंकज कृष्णराव पांडे (२८, रा. प्रोफसर कॉलनी), अंकुश राजेन्द्र मेश्राम (२९, रा. वरुन नगर) या सहा जणांसोबतच पोलिसांनी एका अल्पवयीनाला पकडले होते. याचवेळी एक जण घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. 
 
सोमवारी (दि. १३) पहाटे तीन वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सात ते आठ जण पुलाखाली संशयास्पद रितीत आढळून आले. पोलिसांनी त्यांची विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना सतूर, चाकू, मिरची पुड, दोरी असे साहीत्य मिळून आले. ते दरोडा टाकण्याच्या उद्देशात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान सोमवारी (दि. १३) दुपारीच त्यांना न्यायालयापुढे हजर केले होते. 
 
यावेळी न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याचवेळी यांच्यासोबत असलेला अन्य एक जण पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहे. ही कारवाई एपीआय सतिश इंगळे, एएसआय दिलीप वाघमारे, इशय खांडे, गौतम धुरंदर यांच्यासह अन्य पोलिसांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...