आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त १६ फेब्रुवारीपासून छत्रपती महोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- दरवर्षी प्रमाणे यंदाही १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत शिवर्तीथ समता मैदान येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्याच्या, युवकांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

छत्रपती महोत्सवामध्ये १६ फेब्रुवारीला शिव निबंध स्पर्धा, राज्यस्तरीय शिव काव्य स्पर्धा, विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ‘बळीराजा जगाचा पोशिंदा' या विषयावर फोटोग्राफी स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेचे अध्यक्ष सुभाष राय यांच्या हस्ते छत्रपती महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री दरम्यान पुणे येथील सुप्रसिद्ध वक्त्या प्रतिमा परदेशी यांचे ‘छत्रपती शिवरायांची बदनामी एक षडयंत्र’ या विषयावर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एकल नृत्यस्पर्धा अकरा पारितोषीक विजेती विद्रोही शाहीरी दोन अंकी नाटक ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वेशभूषा स्पर्धा पुणे येथील प्रसिद्ध वक्ते, विचारवंत लेखक गंगाधर बनबरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर' या विषयावर दुसरे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १९ रोजी सकाळी शिव मॅरॉथॉन स्पर्धा, राज्यस्तरीय कराटे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्य शिवजयंती बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जीवन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे ‘अत्त दिप भव' या विषयावर तिसरे जाहीर व्याख्यान होणार आहे. वरील चारही दिवशी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवक, महिला, पुरूष यांना छत्रपती संभाजी राजे, युवा पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ, माँ साहेब पुरस्कार, छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी पारधी बेड्यावर वैद्यकीय शिबिर बालरोग विभागास भेट मदत, २३ रोजी क्रांतीसंत गाडगे महाराज जयंती निमित्त व्यसनमुक्ती प्रबोधन, २४ रोजी विनामूल्य नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आदी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जि.प. सदस्य राहुल माणिकराव ठाकरे राहणार आहेत.

या वेळी पत्रकार परिषदेला सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीची पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवजंयतीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक सेवाभावी संस्था यांनी पुढाकार घेतला आहे.