आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप, काँग्रेस दोघेही आमचे शत्रू, अॅड. अणे म्हणाले आगामी निवडणूक लढवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - वेगळ्या िवदर्भाच्या मुद्द्यावर भाजप व काँग्रेस हा आमचा क्रमांक एकचा शत्रू असून, वेगळ्या िवदर्भाच्या अांदाेलनात िशवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीतच धरत नाही, अशा खाेचक शब्दांत विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी राजकीय पक्षांचा समाचार घेतला. तसेच विदर्भ राज्य अाघाडी अागामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या िनवडणुका लढवण्याचा पुनरुच्चार त्यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

पश्चिम िवदर्भाच्या दाैऱ्यावर असलेल्या अॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी विभागीय कार्यकर्ता बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यंदा अाणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला नगरपालिका, नगरपरिषदा व महापालिका िनवडणुका हाेणार अाहेत. या िनवडणुका िवदर्भ राज्य अाघाडी लढणार अाहे. वेगळ्या िवदर्भासाठी राजकीय दबाव अावश्यक अाहे. यािशवाय सध्या तरी दुसरा पर्याय नसल्याने िनवडणुकीतूनच पुढील मार्ग प्रशस्त हाेईल, असे अणे यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...