आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमरेला बांधून गांजाची तस्करी, 5 आरोपींना अटक; चांदूर रेल्वे मार्गावर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींकडून गांजा पकडल्यानंतर कारवाई करताना पोलिस पथक. - Divya Marathi
आरोपींकडून गांजा पकडल्यानंतर कारवाई करताना पोलिस पथक.
अमरावती - चार दिवसांपुर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी आंध्रातून शहरात आलेला ३७ किलो गांजा जप्त केल्यानंतर हा गांजा शहरात कोणासाठी आणला होता, याविषयीचा संभ्रम कायम असतानाच सोमवारी (दि. १७) पुन्हा ३४ किलो गांजा घेऊन शहरात आलेल्या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या गांजाची किंमत लाख ३७ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या पाचही जणांनी प्रत्येकी सात किलो गांजा आपल्या कमरेला बांधून आणण्याचा नवीन फंडा शाेधला होता. 
 
ऑटो चालक अब्दुल शफी अ. रहमान (४९, रा. महादेवपुरा, वर्धा), शेख हारुन ऊर्फ राजू शेख मोहम्मद (४२) शेख रेहान शेख हारुन (१९ दोघेही रा. यास्मीननगर), कासीफ खान वाहेद खान (२० रा. नमुना गल्ली, अमरावती )आणि अब्दुल हमीद शेख तुराब (४९, रा. नमुना गल्ली क्रमांक ५, अमरावती) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण चांदूर रेल्वेकडून अमरावतीकडे येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदूर रेल्वे मार्गावरील वाघामाता मंदिराजवळ सापळा रचला होता. हे पाचही जण ऑटोने (क्रमांक एम. एच. ३२ बी ८२६१) शहराच्या दिशेने येत असताना सोमवारी दुपारी १२ वाजतादरम्यान पोलिसांनी त्यांना पकडले, त्यांची झडती घेतली. यावेळी प्रत्येकाच्या कमरेजवळ एका विशिष्ठ पद्धतीने बॅगसारख्या वस्तूमध्ये हा गांजा गुंडाळून ठेवल्याचे आढळले. प्रथमदर्शनी तर यांच्याकडे गांजा नाही, असेच पोलिसांना वाटले. मात्र पोलिसांनी झडती घेतली असता या पाचही जणांकडे गांजा आढळून आला. ही कारवाई पीआय प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात पीएसआय साबीर हैदर शेख, जगदीश पाली, संजय वानखडे, ओमप्रकाश देशमुख, विनोद गाडेकर, अमर बघेल, सुलतान शेख, नीलेश येरणे, निवृत्त काकड, सचिन राठोड यांनी केली . 
 
मोठे मासे कधी लागणार गळाला? 
गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत दोन कारवाई करून शहरात येणारा तब्बल ७५ क्विंटल गांजा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाई केली. मात्र शहरात नेमका कोणासाठी हा गांजा येत होता, याचा उलगडा झाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या हातात हे बडे मासे कधी लागणार , असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...