आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभी गावात सर्पदंशाने बहीण-भावाचा दुदैवी अंत, घटनांमुळे गावावर शोककळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
महागाव - महागाव तालुक्यातील टेंभी या गावात राहणाऱ्या चिमुकल्या बहिण भावाचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण टेंभी गावात शोककळा पसरली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अस्मिता साहेबराव धबडगावकर वय वर्ष आणि देविदास साहेबराव धबडगावकर वय वर्ष अशी दुदैवी मृत बहीण-भावाची नावे आहेत. 
 
टेंभी गावात राहणाऱ्या साहेबराव धबडगावकर यांना 3 मुली 1 मुलगा होता. 1 शनिवारी 8 एप्रिलला धगडगावकर परिवारातील सर्वजण रात्री झोपले होते. याचवेळी त्यांच्या 4 वर्षाच्या देवीदास नावाच्या मुलाच्या हाताला घरात आलेल्या सापाने चावा घेतला. त्याचवेळी बाजूलाच झोपून असेलेल्या त्याच्या 6 वर्षाच्या अस्मिता नावाच्या बहिणीलाही या सापाने चावा घेतला. 
 
दरम्यान, देविदास याला साप चावलयाने जाग आली. त्याने आपल्या हाताला काहीतरी चावल्याचे त्याच्या आईला सांगितले. यावेळी त्या ठिकाणी त्याच्या आईने पाहणी केली असता त्यांना साप आढळून आला. याचवेळी त्यांना अस्मितालाही साप चावल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अंगात सापाचे विष भिनल्यामुळे अस्मिताचा ताबडतोब त्याच ठिकाणी मृत्यू झाला होता. त्यानंतर साहेबराव आणि त्यांच्या पत्नीने देवीदास याला तत्काळ खाजगी उपचार करण्याकरिता नेले. मात्र, वाटेतच त्याचा देविदासचा मृत्यू झाला. 
 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून दोन्ही मुलांचे मृतदेह सवना येथील सरकारी दवाखानामध्ये उत्तरीय तपासणी करीता नेण्यात आली. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर टेंभी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेने धगडगावकर परिवार हादरुन गेला असून संपूर्ण गावात या प्रकाराबद्दल ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे टेंभी येथे राहणाऱ्या सतीश मस्के या युवा शेतकऱ्याचाही शुक्रवारी साप चावल्याने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आज पुन्हा टेंभी गावातच दोन निष्पाप बहीण-भावाचाही मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सातत्याने या टेंभी गावावर दोन दिवसांपासून संकट येत असल्यामुळे गावातील काही लोकांनी चुली सुद्धा पेटविल्या नाहीत. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. या विषारी सापाचा बंदोबस्त
वनविभागाकडून करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...