आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यांवर कुडकुडणाऱ्या निराधार जीवांना ‘ते’ देतात माणूसकीची ऊब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्वत:आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य. ना कुणाकडे गडगंज संपत्ती, ना मागे कुणी दानदाता. व्यवसायातून होणारी कमाई तशी तुटपुंजीच. तरीही समाजाबद्दल हृदयात निरंतर वाहणारा आपुलकीचा झरा आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अस्वस्थ होणाऱ्या शहरातील पाच मित्रांनी रात्रीच्या थंडीत रस्त्यांवर कुडकुडणाऱ्या अनेक निराधार जीवांकरिता ब्लँकेटचे वाटप करून माणूसकीची उब निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रात्री -बेरात्री रस्त्यावर कुडकुडणारा व्यक्ती दिसला की, हे मित्र त्या ठिकाणी जाऊन त्याच्या अंगावर ब्लँकेट पांघरून त्याची रात्र ऊबदार करण्याचा प्रयत्न करतात.

सद्या कडाक्याची थंडी आहे. दोन दोन ब्लँकेट घेऊनही घरात थंडी आवरत नाही. निराधार असलेल्या व्यक्तींना अशावेळी रस्त्यावर कुडकुडत रात्र काढावी लागते. ते थंडीचा कसा सामना करत असतील? याची कल्पनाही आपण करू शकत नाही. कारण सद्या शहरात पारा ९.५ अंशापर्यंत खाली उतरला आहे. मात्र त्यांनाही जीव आहे, त्यांनाही थंडीत ऊब पाहीजे हीच जाणीव ठेवून शहरातील गांधी चौक परिसरातील कुणाल चपटे, सचिन चपटे, विनय देशपांडे, पंकज पोकडे आणि गौरव पानसे या पाच मित्रांनी अशा निराधारांना असेल त्या ठिकाणी ब्लँकेट पोहचवण्याची सोय केली आहे. याच वर्षांपासून सुरू केलेला हा उपक्रम संपूर्ण हिवाळा संपेपर्यत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे पाच मित्रांपैकी कोणीही गर्भश्रीमंत नाही. कुणाल, सचिन हे बंधू पानमंदिर चालवतात तर पंकज पोकडे हे खासगी नोकरी करतात, गौरव यांचे खादी भंडार आहे आणि विनय देशपांडे हे एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत आहे.

दुसऱ्यांना ऊब मिळावी हाच उद्देश
दिवाळीदरम्यान गरजवंतासाठी काही तरी करायचे असे ठरवले होते मात्र त्यापेक्षा थंडीत कुडकुडणाऱ्या निराधार गरजवंताना ब्लँकेट द्यावे असे आम्ही ठरवले आणि त्यासाठी सुरूवातही केली आहे. समाजाप्रती काही तरी देणे लागतो, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे.

आतापर्यंत १५ ब्लँकेटचे वाटप
या पाच मित्रांपैकी कोणाच्याही फोनवर संपर्क केल्यास त्यांना संबधित व्यक्ती कुठे आहे, ही माहीती सांगावी लागणार आहे. त्या व्यक्तीपर्यंत काही वेळातच ब्लँकेट पोहचून जाईल. गांधी चौकातील रत्नाकर पानसेंटरवर संपर्क केल्यासही गरजूंना ब्लँकेट मिळणार आहे. या हिवाळ्यात आतापर्यंत १५ ब्लँकेटचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.


बातम्या आणखी आहेत...