आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सोयाबीन मोडण्याच्या तयारीत, अत्यल्प पावसाचा परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भातकुली - यंदाच्या खरीप हंगामात घेण्यात येणारे सोयाबीनचे हिरवेगार पिकाने शेतकऱ्यांचे हिरव्या शेताचे स्वप्न तर पूर्ण केले, परंतु त्याला शेंगाच भरल्या नसल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. काही ठिकाणी शेंगा आल्यात, मात्र त्यात दाणाच नाही, अशा संकटात सापडलेल्या तालुक्यातील दाढी पेढी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक मोडण्याचा निर्णय घेतला आहे. हिरव्यागार शेतातील पिक मोडताना शेतकऱ्यांच्या उर भरून येत आहे, परंतु खरीपाचे पीक हातातून गेले, तरी रब्बीचा हरभरा स्वप्न पूर्ण करेल, अशी अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आहे. 

त्यामुळे शेंगा भरण्याचा कालावधी लोटूनही शेंगा भरल्याने काळाजावर दगड ठेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक मोडण्याचा निर्णय घेतला आहेवेळेवर आलेल्या पाऊस हे यामागील कारण असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. परिसरातील कृषी मित्रांनी शेतकऱ्यांची ही अवस्था निवेदनाद्वारे तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली, परंतु अद्यापही कृषी अधिकाऱ्यांनी शेताला भेटी देऊन त्याची पाहणी केल्याने दाढीपेढी येथील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. अनिल लेंढे, अविनाश टाले, रामा टाले, गजानन कोल्हे, प्रवीण भरणे, गोपाल भरणे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने सर्वाधिक नुकसान उडीद, मूगाचे झाले. मात्र हिरवेगार दिसणारे सोयाबीनही गेले. सोयाबीनला शेंगा येण्याच्या काळात पाण्याची आवश्यकता असते. नेमका त्याच काळात पाऊस झाला नाही. पीक जगले मात्र त्याला शेंगाच आल्या नाहीत. सोयाबीनच्या एका झाडाला जवळपास सरासरी ४० ते ४५ शेंगा असणे आवश्यक आहे. तेथे १० ते १५ शेंगाच दिसत आहेत. काही ठिकाणी तर एकही शेंग नाही. आपली व्यथा कुणाकडे मांडावी, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी पीकच मोडण्याचा निर्णय घेतला आहे. महागडी बियाणे, फवारणी, यंत्र सामुग्रीचा वापर करूनही पिक हातात आल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...