आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथून तारका समूहातून उल्कावर्षावाला १३ डिसेंबरपासून सुरुवात, एका तासात सरासरी पडतात ८० उल्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येत्या१९ डिसेंबरपर्यंत दरवर्षीप्रमाणे यंदाही मिथून तारकासमूहातून मोठ्या प्रमाणावर उल्कावर्षाव सुरू झाला आहे. १३ डिसेंबरपासून हा वर्षा सुरू झाला असून, पहाटे ते या काळात हा उल्कावर्षाव होतो.एका तासात सरासरी ८० उल्का पडतील. अगदी साध्या डोळ्यांनीही हा उल्कावर्षाव खगोलप्रेमींना बघता येईल. यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नसल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

अमरावती - आकाशात जणू आतषबाजीच सुरू आहे, असा भास व्हावा इतपत चंदेरी पिवळसर प्रकाशाचा रेषा उल्कावार्षावादरम्यान दिसत असतात. या उल्कावर्षावासाठी ३२०० क्रमांकाचा मिथून हा लघुग्रह कारणीभूत आहे. यावेळी पडणाऱ्या उल्कांचा रंग हा काहीसा पिवळसर असेल. ज्यावेळी लघुग्रह सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असतात. त्यावेळी काही भाग मोकळा होतो. हा उल्कावर्षाव म्हणजे लघुग्रहाने मागे टाकलेल्या अवशेषांचे पृथ्वीकडे येणे होय. काही वेळा गतीमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येत असतात. त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास अशनी असे म्हणतात.

उल्काशास्त्रात अशनीचे फार महत्त्वाचे स्थान आहे. बाह्य आवरणातील अर्थात अवकाशातील वस्तुचे नमुने या अशनीमुळे आपणांस मिळतात. म्हणूनच अशा वस्तुंच्या जडण-घडणीचा अर्थ आपणास लावता येतो. ज्यावेळी एखादी उल्का आपणास पडताना दिसते त्यावेळी एखादा तारा तुटून खाली येत आहे, असे म्हटले जाते.

घरातील गच्ची, शहराबाहेरून बघता येणार
मिथून तारका समुहातून होणार उल्कावर्षाव घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून अगदी उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघता येईल. खगोलप्रेमी जिज्ञासूंनी उल्कावर्षावाचे विलोभनीय दृश्य अवश्य बघावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...