आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानांसाठी सरसावणार क्रीडा जगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आपल्याविलक्षण खेळाद्वारे भारतीय हॉकीला जगात प्रतिष्ठा मिळवून देणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे मैदानावरच घडले. त्यामुळे शहरातील मैदानांचे संरक्षण व्हावे अन् अमरावतीतही भावी ‘ध्यानचंद’ घडावेत, या उद्देशाने येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मैदान बचाव जनजागृतीसाठी शहरातील क्रीडा जगताने पुढाकार घेतला आहे. सायन्सकोर मैदानावरून सकाळी वाजता सुमारे एक हजार सायकलपटूंची जनजागृती फेरी निघणार असून, खेळ मैदानांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार मेजर ध्यानचंद यांना खरी आदरांजली ठरणार आहे.
महानगर शारीरिक शिक्षक संघ, जिल्हा क्रीडा शारीरिक शिक्षक संघटनेतर्फे गेल्या दोन दशकांपासून सायकलचा प्रसार करणारी मिशन ऑलिम्पिक्स, शहरातील विविध क्रीडा संघटना, संस्था, अकादमी, क्लब्स, आखाडे मंडळांच्या सहकार्याने सायन्सकोरवर क्रीडा दिनाचे औचित्य साधून मैदान वाचवण्यासाठी क्रीडा नगरी असा मान मिळवणाऱ्या अंबानगरीतील क्रीडा जगतच पुढे सरसावणार आहे. ही फेरी शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत मेजर ध्यानचंद यांची आठवण असू द्या, खेळांसाठी मैदानं वाचवा, सायकल चालवून आरोग्य मिळवा, खेळांचा व्हावा प्रचार प्रसार आणि खेळांमधून मिळवूया राष्ट्रीय एकात्मता, असा संदेश देणार आहेत.
सायकल चालवून शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत होते, इंधनाची बचत होते आणि शरीर तंदुरुस्त राहून क्रियाशीलता वाढते. दुसरे सायन्सकोरवर शहरातील सर्वच टोकातून क्रीडाप्रेमी एकत्र जमणे २९ आॅगस्टला रक्षाबंधनाच्या िदवशी सकाळी शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जर मैदान वाचवण्याचा संदेश पोहोचवायचा असेल तर सायकलसारखे उपयुक्त वाहन नाही,या बाबी हेरून सर्वांपर्यंत आवश्यक तो संदेश पोहोचवण्यासाठी सायकल फेरीची िनवड करण्यात आली आहे. या फेरीत जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गुरुवारच्या बैठकीत ठरणार रूपरेषा
क्रीडादिन, सायकल फेरी आणि मैदान बचाओ अभियानाची रूपरेषा ठरवण्यासाठी शहरातील सर्व क्रीडाप्रेमी संघटना, क्लब्स, अकादमी, आखाडे, संस्था आणि मंडळांची २० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता पं. जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेडियमवर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती महानगर शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय आळशी, उपाध्यक्ष शिवदत्त ढवळे, सचिव संदेश गिरी, कोषाध्यक्ष संतोष अरोरा यांनी दिली आहे.
असाअसेल मार्ग
सायन्सकोरवरहिरवी झेंडी दाखवल्यानंतर रेल्वे स्टेशनमार्गे जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ, यूटर्न घेत इर्विन चौक, पंचवटी, कठोरा नाका, पुन्हा शेगाव नाका, पंचवटी या मार्गाने परत िजल्हा स्टेडियमवर आल्यावर फेरीचा समारोप होणार आहे.
शहरातील बहुतेक संघटना, क्लबचे समर्थन
शहरातील४६ विविध क्रीडा संघटना, क्लब, अकादमी, आखाडे, मंडळ आणि संस्थांसोबतच त्यांचे पदाधिकारी यांचेही या क्रीडा दिनासोबतच मैदान बचाओ अभियानाला समर्थन देणार आहेत. तसेच प्रत्येक संघटनेकडून या फेरीत िकमान ५० सायकलपटू सहभागी व्हावेत, जेणेकरून मैदान सायकल चालवणे हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सर्वांना कळेल, असाही प्रयत्न केला जाणार आहे.

मैदानं, सायकलिंग आजच्या काळाची गरज
स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहराला आरोग्यदायी बळकट मनुष्यांचीही आवश्यकता भासणार आहे. केवळ चकचकित रस्ते, इमारती, माॅल्स, उद्योग सुखसोयीच असून चालणार नाही. तर, शहर आरोग्यदायी, हिरवे प्रदूषणमुक्त ठेवावे लागेल. यासाठी आवश्यकता असेल मैदानं, खेळ अन् प्रदूषणरहित वाहन सायकल चालवण्याची. दीपकआत्राम, सचिव िमशन आॅलिम्पिक्स.
सहकारातून समाधान