आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचे प्रवासी ‘एजंट’कडून बसस्थानकातून ‘हायजॅक’,आगार व्यवस्थापकांची पोलिसांत धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - राज्यपरिवहन महामंडळाच्या आवारात घुसून खासगी वाहनांचे ‘एजंट’ प्रवासी ‘हायजॅक’ करत असल्याची तक्रार, रविवार, ११ डिसेंबर रोजी आगार व्यवस्थापकाने वडगाव रोड पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी कारवाई करावी, असेही पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे ही बाब वरिष्ठ कार्यालयात सुद्धा लेखी स्वरूपात कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम पडत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे. परिणामी, दैनंदिन कुठल्या कुठल्या प्रकारचे अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासनाने यावर पायबंद घालण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, बऱ्याचवेळा पोलिसच बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे सर्रास अवैध प्रवासी वाहतूक डोके वर काढत आहे. अशात बसस्थानकात घुसून प्रवासी नेण्याचा प्रकारही वाढलेला आहे. या प्रकारामुळे अनेकवेळा एसटी प्रशासनाच्या वतीने वडगाव रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. परंतु पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची पावले उचलण्यात येत नाही. परिणामी, अवैध प्रवासी वाहतूक दिवसागणिक वाढत आहे. याचा फटका परिवहन महामंडळालाही बसत आहे. असाच काहीसा प्रकार ११ डिसेंबर रोजी बसस्थानक परिसरात घडला.

खासगी वाहतूक करणाऱ्या काही वाहकासह, चालक तसेच एजंटने बसस्थानक परिसरात घुसखोरी केली. त्यामुळे आगार व्यवस्थापक रमेश उइके यांच्यासह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना बाहेर काढून दिले. त्यानंतर उईके यांनी थेट वडगाव रोड पोलिस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती देत लेखी तक्रार दिली. खासगी वाहनाचे एजंट बसस्थानक परिसरात येऊन प्रवाशांना घेऊन जात असल्याचे त्यात नोंद केले.

यात प्रामुख्याने वणी, धामणगाव, घाटंजी आणि नागपूर येथे जाणाऱ्या वाहनाचे एजंट सर्वाधिक असल्याचेही नमूद केले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. परिवहन महामंडळाकडून अनेकवेळा पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. परंतु पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची पावले उचलण्यात आली नाही. आताच्या तक्रारीवर वडगाव रोड पोलिस पायबंद घालणार, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम
सुरक्षित आणि सुखकर प्रवास म्हणून एसटीकडे पाहिल्या जाते. अशा परिस्थितीत बरेचजण एसटीवर निर्भर असतात. परंतु अशा प्रवाशांना खासगी वाहन चालक विविध प्रकारच्या भूलथापा देऊन वळवण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी, एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर फरक पडत आहे.

अनेक महिन्यांपासून प्रकार सुरू
-गेल्याकाहीमहिन्यापासून ही बाब सातत्याने घडत आहे. बऱ्याचवेळा खासगी वाहन चालकांच्या एजंटला हटकल्या जाते. परंतु अन्य कुठल्या कुठल्या माध्यमातून प्रवासी नेण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आता पुन्हा एकदा पोलिसांना अवगत करून देण्यात आले. तसेच वरिष्ठांकडेही पत्रव्यवहार केला आहे. तसेच पोलिसांनाही कळवले आहे.''
रमेशऊईके, आगार व्यवस्थापक, यवतमाळ.

संबंधितांवर कारवाई करू
-बसस्थानकपरिसरातील२०० मीटरपर्यंत खासगी वाहन उभे करता येत नाही. अशा प्रकारचे वाहन आढळून आल्यास कारवाई करू. आज आगार प्रमुखांनी दिलेल्या तक्रारी बाबत माहिती नाही. मात्र, असे काही आढळून आल्यास नक्कीच कारवाई करता येईल. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’’
देविदासढोले, ठाणेदार, वडगाव पोलिस स्टेशन.
बातम्या आणखी आहेत...