आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ST कर्मचाऱ्यांचे ‘अर्धनग्न’ आंदोलन, सातवा वेतन आयोग लागू करण्याची केली मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धनग्न आंदोलन करताना एसटीचे कर्मचारी. - Divya Marathi
अर्धनग्न आंदोलन करताना एसटीचे कर्मचारी.
यवतमाळ - एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यासाठी गुरुवार, दि. २० जुलै रोजी विभागीय कार्यालयाच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाला कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
 
निवेदनानुसार, एसटी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी, सहावा वेतन आयोग मिळण्यात यावा, दि. एप्रिल २०१६ च्या मुळ सवेतनावर २५ टक्के अंतरिम वाढ त्वरीत लागू करण्यात यावी, टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्यात यावा, नियम बाह्य कामगार विरोधी जाचक परिपत्रक रद्द करण्यात यावे, शिस्त अपिल कार्य पद्धतीचा दुरूपयोग बंद करण्यात यावा, वेळापत्रकामधील त्रुटी दूर करण्यात यावा, तसेच प्रत्यक्ष लागणारी धाववेळ देण्यात यावी, करार कायदे परिपत्रकाचा भंग करून आकसपूर्ण घेतलेले निर्णय रद्द करण्यात यावे, लांब पल्याच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत पास देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार निवृत्त वेतन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी गुरुवारी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गत तीन-चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेशाचे कापड मिळालेले नसल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने बनियनवर निदर्शने करून महामंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 
 
यावेळी विभागातील सर्व आगार युनिटमधील बहुसंख्य कामगार निदर्शन आंदोलनात सहभागी झाले होते. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे केंद्रिय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर, विभागीय अध्यक्ष राहुल धार्मीक, कार्याध्यक्ष अरूण वाघमारे, प्रकाश देशकरी, सलीमउद्दीन शेख, प्रविण बोनगिनवार, उगले, विलास डगवार, इंचोळकर, पंधरे, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी नितीन चव्हाण, दिगांबर गुघाणे, प्रितम ठाकूर, गोविंद, योगेश रोकडे, अंकुश पाते, मुंजेकर, सलिमशाहा, सै. इरफान, प्रविण राऊत, शेख लाल, अरूण काळे, आदींसह शेकडो कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...