आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत वादळाचा कहर: 10 मिनिटांत 36 लाखांचा फटका, 424 विद्युत खांब उन्मळूून पडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. ५) सायंकाळी आलेल्या सुमारे दहा मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे तब्बल ४२४ विद्युत खांब उन्मळून पडल्याने महावितरणचे तब्बल ३५ लाख ८८ हजारांचे नुकसान झाले असून,जिल्ह्यातील वीज पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या, त्यासाठी असलेले विद्युत खांब, डीपी आदींच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही याचा जबर फटका बसला आहे. दरम्यान, सोमवारपाठोपाठ मंगळवारी (दि.७) सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील काही भागातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली. त्यामध्ये विद्युत खांब तारा तुटल्याने शहरातील अनेक भागात अंधार पसरला होता.

मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली आहे, मागील चार दिवसांपासून दरदिवशी सायंकाळी पाण्याचे वातावरण तयार होते, तुरळक पाऊस कोसळतो, मात्र या वेळी जोरदार वादळ राहते. दमदार पाऊस मात्र अजूनही आलेला नाही. रविवारीसुद्धा असेच वातावरण होते, सायंकाळी वाजेपर्यंत आकाश निरभ्र होते, प्रचंड उकाडा होता आणि सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे तुरळक पाऊस झाला आणि जोरदार वारा सुरू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळल्याने तारा तुटल्या, शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली. पर्यायाने पाहता पाहता शहरासह जिल्हाभरात वीजपुरवठा खंडित झाला. अनेक गावांसह शहरातही वीज वाहिन्यांवर मोठ मोठी झाडे उन्मळून पडली, त्यामुळे विद्युत तारा तुटल्या, तसेच इतर साहित्य तुटताट झाले, याशिवाय झाडे तर मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली. या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४२४ विद्युत खांब तुटून पडले, काही वाकले. यामध्ये उच्च वीज वाहिनीचे ११५ तर लघू वीज वाहिनीचे तब्बल ३०९ विद्युत पोल तुटले असून, ते नवीन बसवण्याचे काम सुरू आहे. विद्युत खांब इतर साहित्याचे नुकसान झाल्यामुळे महावितरणचे तब्बल ३५ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रविवारी सायंकाळी झालेल्या नुकसानामुळे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार सातत्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामावर आहेत, मात्र नुकसान इतक्या जास्त प्रमाणात आहे की, रविवार, सोमवारची रात्र उलटूनही मंगळवारी सकाळपर्यंतही अनेक भागातील वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. यामध्ये जिल्ह्यातील ते १० गावांचा समावेश होता तसेच शहरातील ४०० ते ५०० घरांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मंगळवारीसुद्धा दिवसभर काम सुरू होते. दरम्यान, शहरात मंगळवारी रात्री सर्वच भागातील पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मनुष्यबळ वापरले
रविवारी झालेल्यावादळामुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब कोसळले होते. त्यामुळे शहरातील अनेक भागांसह जिल्ह्यातील अनेक गावांचा रविवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, रविवार सायंकाळपासून ते मंगळवारी सायंकाळपासून आमची यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत होती. या वेळी अतिरिक्त मनुष्यबळसुद्धा वापरण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.या वादळामुळे ३५ लाख ८८ हजारांचे नुकसान झाले आहे. अरविंद भादीकर, अधीक्षकअभियंता.

सहकार्य करावे
वादळामुळेमहावितरणलाजबर फटका बसला आहे. झाडे उन्मळून विद्युत वाहिन्यांवर पडल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहे. शिवाय, रात्री अपरात्री काम करत असताना वीज कर्मचाऱ्यांची एक चूक ही त्यांच्या जीवावर बेतू शकते. अशा वेळी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे. सुहास रंगारी, मुख्यअभियंता,महावितरण कंपनी.

मालटेकडी परिसरात ४४ तास बत्ती गुल
शहरातील मालटेकडी भागात मजीप्राच्या मुख्य कार्यालयाचा तसेच मालटेकडीवर असलेल्या जलकुंभाचा वीजपुरवठा रविवारी रात्री खंडित झाला तो थेट मंगळवारी दुपारी सुरू झाला. तब्बल ४४ तास वीजपुरवठा खंडित असल्यामुळे मालटेकडीवर असलेले जलकुंभ भरल्याच गेले नाही. त्यामुळे रविवार, सोमवार हे दोन्ही दिवस नागरिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या भागातील अनेक नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागली.
नवसारी भागातील दीडशे वर्षे जुने महाकाय वडाचे झाड मुळासहित पडल्याने तारा तुटल्या
छाया: मनीष जगताप.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, महाकाय वटवृक्ष कोसळल्‍याचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...