आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासाच्या खोलीतच विद्यार्थ्याची आत्महत्या, होता आई-वडिलांचा एकुलता एक आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( पोटो ओळ- एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आदर्शच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला.)
परतवाडा- अभ्यासाच्याखोलीतच गळफास घेऊन एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. आदर्श झोड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो अचलपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विदर्भ मिल परिसरातील खानझोडे ले-आऊटमधील निवासी दीपक नामदेवराव झोड यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आदर्श हा सुबोध हायस्कूलचा बारावीचा विद्यार्थी होता. बळेगाव येथील निवासी दीपक झोड हे व्यवसायाने शेतकरी असून, ते विदर्भ मिल येथे ते अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे झोड हे सकाळी शेतीच्या कामासाठी बळेगावला निघून गेले, तर आई, वैशाली घरकामात गुंतली. वेळ होऊनही आदर्श खोलीबाहेर आल्याने वैशाली यांनी आदर्शच्या खोलीत डाेकावून पाहिले असता ताे पंख्याला गळफास घेतलेला दिसला. शेजाऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. १२ वीतील सुबाेधने असे आत्मघातकी पाऊल का उचलले, हे रहस्य असून याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

मुलाचा मृत्यू पाहून आईने फोडला हंबरडा
बारावीतशिकणाऱ्या एकुलत्या एका मुलाने, आदर्शने आपल्या अभ्यासाच्या खोलीचे दोन्ही दरवाजे लावून आत्महत्या केली. मुलाचा मृत्यू पाहून आईने एकच हंबरडा फोडला.