आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रामगिरी’वरील कर्मचाऱ्याची सावकारी जाचाने अात्महत्या, नागपुरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सावकाराचे कर्ज फेडण्यात अपयश येत असतानाच सावकाराच्या लोकांनी घरी येऊन अपमानित केल्यामुळे निराश झालेल्या दांपत्याने आपल्या चिमुकल्यासह कीटकनाशक घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली. या दांपत्याचा पाच वर्षांचा मुलगा या घटनेतून बचावला. अर्चना (वय ४०) व सुभाष लोहकरे (वय ४०) अशी मृतांची नावे अाहेत. 

मृत सुभाष हे नागपूर महापालिकेत नाेकरीस असून सध्या मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर सफाईसाठी कामाला हाेते. आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. याआधारे पोलिसांनी दोघा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.   

सुभाष  यांनी दाेन सावकारांकडून अनुक्रमे ४६ हजार आणि २० हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र हे पैसे वसूलीसाठी सावकाराकडून तगादा सुरू हाेता. २४ एप्रिल रोजी सावकाराचे पाच लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी सुभाष यांना शिवीगाळ केली हाेती. त्यामुळे प्रचंड तणावाखाली आलेल्या सुभाष यांनी साेमवारी साेमवारी पत्नी अर्चना व मुलगा आराध्य यांना किटकनाशक देऊन स्वत:ही प्राशन केले.  यात पती-पत्नी मरण पावले. हा प्रकार त्यांच्या शेजारी राहणारा लहान भाऊ विकास लोहकरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आराध्य याला खासगी रुग्णालयात दाखल केले अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...