आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपन्न मागासवर्गीयांनी आरक्षण सोडावे; माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचे परखड मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आरक्षणामुळे मागासवर्गीयांची प्रगती होत आहे. मात्र, आता आरक्षणामुळे संपन्न झालेल्या मागासवर्गीयांनी आरक्षणाचा लाभ घेणे अपेक्षित नाही. ती एक प्रकारे लाचारी ठरेल, असे परखड मत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

 

नागपुरातील कार्यक्रमात शिंदे म्हणाले, आता इतर समाज आरक्षणाची मागणी करीत आहेत. आपण शाळेत शिष्यवृत्ती, आरक्षणाचे फायदे घेतले. मात्र, आर्थिक प्रगती झाल्यावर आपण व मुलांनी कोणतीही सवलत घेतली नाही. सधन मागासवर्गीयांनी आरक्षणाचे लाभ घेऊ नयेत. याऐवजी त्याचा इतर आर्थिक मागासलेल्या घटकांना कसा लाभ होईल, या भूमिकेतून या मुद्द्याकडे बघायला हवे, असेही ते म्हणाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, खुल्या प्रवर्गातील गरिबांना २५% आरक्षण द्या - रामदास आठवले...

बातम्या आणखी आहेत...