आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"स्वाभिमानी'वर सौदेबाजीचा आरोप; ‘एफआरपी'चा तोडगा अमान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उसाची ‘एफआरपी’ दोन हप्त्यात अदा करण्याची तडजोड स्वीकारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांच्यावर इतर शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत. सत्तेसाठी शेट्टी यांनी सौदेबाजी केल्याचा आरोप करत सरकारच्या तोडग्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

ऊस घातल्यापासून १४ दिवसांत ‘एफआरपी’ देण्याचे बंधन आहे. मात्र तीन हप्त्यात ‘एफआरपी’ देण्याची मुभा मिळावी, अशी कारखान्यांची मागणी होती. यावर ८० टक्के रकमेचा पहिला हप्ता व २० टक्के सव्याज देण्याचा तोडगा शुक्रवारी काढण्यात आला. मात्र या तोडग्याला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी आक्षेप घेतला. हा अन्याय असून राजू शेट्टी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे देवांग यांनी सांगितले. "सुप्रीम कोर्टाच्या अनेक आदेशांनंतरही अनेक कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. आताचा तोडगा फक्त कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापुरता आहे. विदर्भ, मराठवाड्यात एफआरपीपेक्षाही कमी भाव मिळतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'स्वाभिमानी'ने बेकायदा भूमिका घेतल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केला. कर्नाटक सरकारने १४ दिवसांतच एफआरपी देण्याच्या स्पष्ट सूचना तिथल्या कारखान्यांना दिल्या. हीच भूमिका राज्यात घ्यायला हवी होती. 'स्वाभिमानी'ने मंत्रिपदासाठी तोडगा स्वीकारला असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास
- "एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सव्याज मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याने त्यावर विश्वास ठेवला. सध्या उसाचे तातडीने गाळप होणे महत्त्वाचे आहे. कारखान्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे एक पाऊल मागे आलो. जोपर्यंत माझ्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे तोवर टीकेची काळजी करत नाही. - राजू शेट्टी
बातम्या आणखी आहेत...