आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाईन फ्लू’चे शहरामध्ये आढळले आठ संशयित रुग्ण, 628 रुग्णांची घेतली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्वाईनफ्ल्यूचे आठ संशयित रुग्ण आढळल्याने मनपा क्षेत्रात हा घातक आजार पाय पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विलासनगरात सर्वाधिक पाच, वडाळी, दस्तूर नगर बडनेरा परिसरात प्रत्येकी एक स्वाइन फ्ल्यू संशयित रुग्ण असल्याचे समोर आले. आरोग्य विभागाने १४ हजार ५३ घरांना भेटी दिल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. 
 
शहरात स्वाईन फ्ल्यूचे संशयित रुग्ण असल्याची माहिती प्राप्त होताच मनपाने बैठक घेतली होती. त्या बैठकीत निश्चित केल्याप्रमाणे १२ ते १५ एप्रिल दरम्यान मनपा शहरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील परिसरात सर्वेक्षण केले. यादरम्यान ६२८ तापाचे रुग्ण असल्याचे आढळले असून यातील आठ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली. स्वाईन फ्लूचे संशयीत रुग्ण आढळलेल्या परिसरात उपाययोजन्याच्या, या आजारावर नियंत्रणाच्या दृष्टिने सोमवारी १७ एप्रिलला मनपात बैठक घेतली. या आजाराचा प्रादुर्भाव होवू नये, आळा घालण्याच्या दृष्टिने बैठकीत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा या बैठकीत घेतला. संशयित रुग्ण आढळलेल्या परिसरात उपाययाेजना आरंभ करण्याचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले. स्वाईन फ्लूविषयी जनजागृतीसाठी प्रभागात नगरसेवकांना भेटून कॉर्नर बैठकींचे आयोजन करीत त्यात नागरिकांना आजाराची लक्षणे प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या. मनपा, खासगी शाळांचे मुख्याध्यापक-प्राचार्यांना भेटून प्रार्थनेच्या वेळी मुलांना स्वाईन फ्लू बाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या. स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी १०४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. अरुण राऊत यांनी केले आहे. 
 
स्वाईन फ्ल्यू बाबत आढावा घेताना आयुक्त हेमंत पवार अन्य 
सद्य:स्थितीत पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणावरुन शहरात आलेल्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी प्रकारचा त्रास जाणवत असेल तर रुग्णालयात औषधोपचार घेण्याच्या सूचना दिल्या. 
 
वातावरणाचा परिणाम 
- वातावरणात बदल होत आहे. सकाळी, रात्री थंड, दुपारी उष्ण वातावरण असते. यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होत आहे. मनपातर्फे स्वाईन फ्लूचा अहवाल प्रसिद्ध होतो. 
-डॉ.सीमा नेताम, वैद्यकीय अधिकारी. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, असा आहे सर्वेक्षणाचा गोषवारा आणि ही आहेत आजाराची लक्षणे... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...