आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा टीसी स्वरूप आता एकसारखे, राज्यभर एकाच नमुन्याचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
धामणगाव रेल्वे (अमरावती) - राज्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एकसारखेपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे  २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सुधारित नमुन्याचा वापर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांंना दिले आहेत.
शाळा सोडल्याचा दाखला व जनरल रजिस्टरच्या सुधारित नमुन्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात व जनरल रजिस्टरमध्ये बदल करावा लागणार आहे. हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना हा निर्णय लागू राहणार आहे.
 
सर्व शाळा प्रमुखांना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांची शासनाने दिलेल्या नमुन्यात छपाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या शाळा-शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण  होत होता.
 
सरल प्रणालीसाठीही बदल : सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी नोंदवहीमध्ये कोणकोणत्या नोंदणी आवश्यक आहेत, याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...