आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ कुणाला दैवाचा कळला: काळकर दाम्पत्याची साता समुद्रापार मुलीच्या भेटीची इच्छा राहिली अपूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडमध्ये वाहन दरीत  काेसळल्यानंतर जखमींना  पोलिस व स्थानिक नागरिकांनी उचलून रुग्णालयात दाखल केले, तो क्षण. - Divya Marathi
उत्तराखंडमध्ये वाहन दरीत काेसळल्यानंतर जखमींना पोलिस व स्थानिक नागरिकांनी उचलून रुग्णालयात दाखल केले, तो क्षण.
अमरावती - सातासमुद्रापार अमेरिकेत राहणाऱ्या एकुलत्या एका लेकीची ओढ काळकर दाम्पत्याला लागली होती. त्यासाठी त्यांनी ३० मे रोजीची विमानाची तिकिटेही त्यांनी आरक्षित केली होती. दरम्यान अमेरिकेला जाण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने मित्र मंडळींनी अमेरिकेला जाण्यापुर्वी केदारनाथाचे दर्शन घेण्याची विनंती करून सोबत नेले. मुलीच्या भेटीची आस लागल्यामुळे काळकर दाम्पत्याला तीर्थयात्रेला जाण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु  मित्र मंडळीच्या आग्रहास्तव केलेली केदारनाथाची यात्रा काळकर यांच्या मुलीसाठी आई वडिलांच्या प्रेमापासून पोरकी करून गेली. केदारनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या चार भाविकांच्या  अकाली जाण्याने प्रकाश नगर, वसंुधरा कॉलनी आणि योगक्षेम कॉलनीत दु:खाचे सावट पसरले आहे. 

चंद्रकांत काळकर हे पाटबंधारे विभागात अभियंता होते. एक वर्षांपुर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना एक मुलगा स्वप्नील व स्वप्ना नावाची मुलगी आहे. मुलगा पुण्यात अभियंता आहे तर मुलगी स्वप्ना हिचे पती अमेरिकेत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे. मागील सहा वर्षांपासून मुलगी अमेरिकेत आहे, मात्र नोकरीवर असताना मुलीकडे जाणे त्यांना शक्य झाले नव्हते. आता निवृत्तीनंतर मुलीकडे जायचे, काही दिवस  राहायचे म्हणून काळकर दाम्पत्य अमेरिकेत मुलीकडे जाणार होते. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली होती. ३० मे रोजीचे विमानाचे तिकीटही तयार होते. मात्र परिसरातील काही ओळखीची मंडळी केदारनाथला निघाली होती, यांनाही सोबत येण्यासाठी विनंती झाली म्हणून चंद्रकांत काळकर व त्यांच्या पत्नी कुंदा हे त्यांच्यासोबत १ मे रोजी शहरातून केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथसाठी रवाना झाले होते. गंगोत्रीला दर्शन अाटोपून शनिवारी या भाविकांचा जत्था यमुनोत्रीवरून केदारनाथच्या दिशेने जात असताना काळकर दाम्पत्य बसलेल्या बारा आसनी टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाला. ही टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळली. यामध्ये काळकर दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काळाने त्यांच्यावर झेप घेतली, त्यामुळे साता समुद्रापार राहणाऱ्या मुलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या काळकर दाम्पत्याची इच्छा अपूर्णच राहिली. चंद्रकांत काळकर हे चार भाऊ आहेत. त्यापैकी चंद्रकांत हे दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ होते. अशी माहिती त्यांचे थोरले बंधू दिवाकर काळकर  यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. या घटनेची माहिती परिसरात कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. घरी आप्तेष्ठांची गर्दी झाली असून काळकर दाम्पत्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला..
 
पुढील स्लाइडवर वाचा,
- अमेरिकेला जाण्याची तयारी झाली होती
- ११ वाजून ०२ मिनीटांनी पाठवला शेवटचा ‘सेल्फी’
- संजय पाटील होते मंडल कृषी अधिकारी
- अधीक्षक अभियंता सुधाकर मुरादे यांची प्रकृती धोक्याबाहेर
- रात्री ९.३० वाजता मृतदेह पोहोचले नागपूर एअरपोर्टवर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...