आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्टींग’ करणारी ती युवती पोलिसांसमोर, 2015 मध्ये महाराजांचे ‘स्पाय कॅमेरा’ने शुटींग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आसेगाव पोलिसात दाखल झालेल्या कथीत महाराजाविरुध्द तक्रार प्रकरणी महाराजांचे गुप्त कॅमेराव्दारे शुटींग करणाऱ्या युवतीचा पोलिसांनी शोध घेतला असून मंगळवारी (दि. १३) पोलिसांनी तीचा जबाब नोंदवला. मात्र तीनेही महाराजविरुध्द तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बारा दिवसांपुर्वी लैंगीक शोषणाची एका तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे. मात्र कोणत्याही महीलेने अद्याप तक्रार दिली नसल्यामुळे पोलिसांनी या महाराजविरुध्द गुन्हा दाखल केला नाही. कथित महाराजाने केलेल्या लैंगीक क़त्याच्या सिडी तक्रारदाराने पोलिस प्रसारमाध्यमांना दिल्या होत्या. मात्र सिडीमध्ये महाराजासोबत दिसणाऱ्या करणाऱ्या महीलांनी महाराजाविरुध्द तक्रार दिली नाही. दरम्यान या सिडीमध्ये असलेले शुटींग कोणी केले, का केले असे प्रश्न पोलिसात तक्रार झाल्यानंतर उपस्थित झाले होते. मात्र मागील अकरा दिवस या प्रश्नांचे उत्तर पोलिसांपुढेही आले नव्हते. दरम्यान २०१५ मध्ये महाराजाची भक्त असलेली एक युवती त्याच आश्रमात राहत होती. तीनेच ‘स्पाय कॅमेराव्दारे’ कथीत महाराजाचे कृत्य कॅमेरात कैद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी मंगळवारी शुटींग करणाऱ्या युवतीचा जबाब नोंदवला आहे. मात्र या युवतीनेसुध्दा महाराजाविरुध्द कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांपुढे महाराजाविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी उपस्थित झालेला पेच अजूनही कायम आहे. दरम्यान या युवतीने महाराजाचे स्टींग करण्यामागचा उद्देश काय होता, त्या सिडीमध्ये असलेला व्यक्ती हाच महाराज आहे किंवा नाही, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहे.
युवतीनेतक्रार दिली नाही: स्पायकॅमेराने शुटींग घेण्यात आले असल्याचे युवतीने जबाबात सांगितले आहे मात्र या युवतीने मंगळवार (दि. १३) सायंकाळपर्यंत तक्रार दिली नाही,असे जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...